पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा केंद्रातल्या मोदी सरकारवर आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “दिल्लीतले नेते निवडणुकीच्या वेळी केवळ खोटं बोलतात, खोटी आश्वासनं देतात, पण पैसे मात्र देत नाहीत.”
ममता बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की, त्यांना त्यांच्या राज्याचे पैसे मिळाले नाहीत. केंद्र सरकार त्या पैशांचं अर्थकारण न करता त्याचं केवळ राजकारण करत आहे. केंद्र सरकार कोणतंही सार्वजनिक कल्याणाचं काम करत नाही. बॅनर्जी यांनी आरोप केला होता की, केंद्र सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेसाठी निधी जारी करत नाही.
मोदी सरकारकडून सीएएच्या नावाखाली लोकांची दिशाभूल
बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की, “भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील मोदी सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आहे.” ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “त्या आणि त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस मतुआ सामुदायाची काळजी घेत आहो. या समाजाचं मूळ बांगलादेशमध्ये आहेत. सीएएच्या नावाखाली मोदी सरकार लोकांची दिशाभूल करत आहे.”
हे ही वाचा >> “आंध्र प्रदेशची नवी राजधानी विशाखापट्टनम”, मुख्यमंत्री जगन रेड्डींची घोषणा
मतुआ सामुदायाची फसवणूक
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मतुआ सामुदायाची काळजी घेत आहोत. परंतु निवडणुका जवळ्या आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते त्यांच्याकडे जातात आणि दावा करतात ते (भाजपा) त्यांचे मित्र आहेत.