नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदी यांची एनडीएच्या प्रमुखपदी एकमताने निवड झाली आहे. त्याचबरोबर एनडीएच्या संसदीय दलाची संसदेच्या मध्यवर्ती संभागृहात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड केली. नरेंद्र मोदी आज (रविवार, ९ जून) पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी काही परदेशी पाहुण्यांनाही निमंत्रण पाठवलं असल्याची माहिती मिळाली आहे. निमंत्रितांपैकी बहुतेकांनी ते भारताचं निमंत्रण स्वीकारलं आहे. मोदींच्या शपथविधीला तब्बल ८,००० लोक उपस्थित असतील. तसेच यामध्ये सात राष्ट्रांचे प्रमुखही सहभागी होतील.

भारताचे ज्या देशांशी घनिष्ठ संबंध आहेत, त्यापैकी जवळच्या सात देशांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच अलीकडेच या सात देशांचे भारताचा सर्वात जवळचा भू-राजकीय प्रतिस्पर्धी चीनशी संबध अधिक दृढ होऊ लागले आहेत.

female ias officers in maharashtra ias officer sujata saunik controversial ias officer pooja khedkar
उथळ अधिकाऱ्यांचा पर्दाफाश!
Who is Neeru Yadav represented in UN
Neeru Yadav : महिला लोकप्रतिनिधींना कोणत्या समस्या जाणवतात? UN मध्ये प्रतिनिधित्व केलेल्या महिला सरपंचांनी मांडली खंत!
Sharad Pawar, meeting, Pimpri,
शरद पवारांच्या सभेची पिंपरीत जोरदार तयारी; अजित पवारांचा एक गट शरद पवार गटात जाणार!
uttar pradesh stampede at religious event
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ८७ जणांचा मृत्यू; तीन चिमुकल्यांसह महिलांचाही समावेश
Argument between two NCP in Parli broke out Sarpanch killed in firing
परळीत दोन राष्ट्रवादीतील वाद विकोपाला, गोळीबारात सरपंचाचा बळी; शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Zadanchi Bhishi in Solapur
गोष्ट असामान्यांची Video: सोलापुरच्या ‘या’ डाॅक्टरांनी सुरू केली ‘झाडांची भिशी’
sudan genocide Darfur marathi news
विश्लेषण: २० हजार मृत्युमुखी, ८० लाख विस्थापित… सुदानमधील दारफूर आणखी नरसंहाराचा यूएनचा इशारा?
Chhagan Bhujbal Manoj Jarange (3)
“माझी राजकीय कारकीर्द मनोज जरांगेंच्या…”, छगन भुजबळांचा पलटवार; लक्ष्मण हाकेंना म्हणाले, “आता तुम्ही…”

पंतप्रधान मोदी यांनी शेजारधर्माला प्राधान्य (नेबरहूड फर्स्ट) देण्याचे भारताचे धोरण लक्षात घेऊन श्रीलंका, बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि मॉरिशस या आपल्या देशाच्या शेजारील राष्ट्रांच्या प्रमुखांना तिसर्‍या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित केलं आहे. दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिनल विक्रमसिंघे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मालदीवचे पंतप्रधान महोम्मद मोईज्जू, सेशल्सचे (पूर्व आफ्रिकेतील देश) उपराष्ट्रपती अहमद अफीक, भूतानचे राजे जिम्मे खेसर नामग्याल वांगचूक, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ (प्रचंड), मॉरीशसचे राष्ट्रपती पृथ्वीराजसिंह रुपून हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या शपथविधीला हजर असतील, कारण या नेत्यांनी भारताचं निमंत्रण स्वीकारलं आहे.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी जेव्हा पहिल्यांदाच पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती, तेव्हा त्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासह सार्क (साउथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन) नेत्यांना निमंत्रित केलं होतं. २०१४ साली मोदींबरोबर सात महिला खासदारांसह ४५ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

हे ही वाचा >> नरेंद्र मोदींच्या नव्या कॅबिनेटमध्ये शिंदे गटाचे किती खासदार असणार? ‘या’ नावांची सर्वाधिक चर्चा!

२०१९ च्या शपथविधीवेळी मोदींनी बिम्सटेक (बंगालच्या उपसागराशी निगडित दक्षिण आशियातील देश) नेत्यांना आमंत्रित केलं होतं. बिम्सटेक देशांमध्ये बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या देशांचा समावेश आहे. त्यासह या शपथविधी सोहळ्यास किर्गिस्तानच्या अध्यक्षांना, शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनचे तत्कालीन अध्यक्ष सोरोनबे जीनबेकोव्ह आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांनाही निमंत्रण पाठवलं होतं. त्यावेळी मोदींबरोबर २४ केंद्रीय मंत्री आणि नऊ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. यावेळी मोदींबरोबर कोणकोणते नेते शपथ घेणार हे अद्याप जाहीर झालेलं नाही.