प्रसारमाध्यमांना उद्देशून ‘प्रेस्टिटय़ूट’ असा उल्लेख केल्यामुळे निवृत्त लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांना माध्यमांनी टीकेचा विषय बनवले, परंतु त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक केले नाही, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंग यांची रविवारी प्रशंसा केली.
युद्धग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करून त्यांना भारतात सुखरूप परत आणण्याच्या ‘अभूतपूर्व’ मोहिमेबद्दल मी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांना सलाम करतो, असे सांगून मोदी यांनी या खात्याच्या मंत्री सुषमा स्वराज यांच्याबद्दलही कौतुकोद्गार काढले. जगभरातील वृत्तपत्रांनी भारताच्या बचावकार्याची ठळक दखल घेतली असताना भारतीय माध्यमांनी मात्र तिकडे दुर्लक्ष केल्याची टीका मोदी यांनी केली.