पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वागणे म्हणजे ‘मी’पणाची बाधा झाल्याचे द्योतक आहे, असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
मोदींनी अलीकडच्या काळात जी विरोधी पक्षांवर टीका चालवली आहे त्यातून त्यांची आत्मकेंद्री वृत्ती दिसून येते, असे अब्दुल्ला म्हणाले. मोदींनी चीन आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यात देशात आपले सरकार येण्यापूर्वी नागरिकांना भारतात जन्मल्याची खंत वाटत असे, असे वक्तव्य करून वाद सुरू केला होता. तसेच परदेशी भूमीवरून मोदींनी देशातील विरोधी पक्षांवर टीका केली होती. या बाबी मोदींची स्वत:लाच महत्त्व देण्याची वृत्ती दिसते असे अब्दुल्ला म्हणाले.