‘तिच्यासाठी मोहम्मद शमीनं आत्महत्येचाही प्रयत्न केला’ पत्नीचा आणखी एक खळबळजनक दावा

अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला होता

मोहम्मद शमी आपली पत्नी व मुलीसोबत (संग्रहीत छायाचित्र)

माझ्याशी लग्न करण्यापूर्वी शमीचे एका तरुणीशी प्रेमसंबध होते. शमीला तिच्याशी लग्न करायचं होतं पण काही कारणासाठी ते होऊ शकलं नाही म्हणून त्यानं आत्महत्येचाही प्रयत्न केला असल्याचा आखणी एक खळबळजनक दावा त्याची पत्नी हसिन जहानं केला आहे. आफ्रिका दौऱ्यावरुन परत आल्याने शमीनं आपल्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तिनं केला होता त्यानंतर गुरुवारी तिनं कोलकात्याच्या लाल बाझार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

शमीचे विवाहबाह्य अनैतिक संबध असल्याचे आरोप करत हसिननं फेसबुवर काही फोटो आणि अश्लिल चॅट्सचे स्क्रिन शॉर्ट टाकत जगाला याचा पुरावा दिला होता. हसिनच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती. शमी यानंतर वादात सापडला होता. एक नाही तर अनेक महिलांशी शमीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप तिने केला. या प्रकरणावर एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना तिने आणखीही काही गौप्यस्फोट केले आहेत. शमीचं त्यांच्या नात्यातल्या एका तरुणीशी लग्नाआधी प्रेमसंबध होते. या दोघांनाही लग्न करायचं होतं पण तिचं कुटुंब दुसरीकडे निघून गेलं त्यामुळे लग्न झालं नाही आणि शमीला याचा धक्का बसला आणि त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आणखी एक खळबळजनक आरोप तिनं केला.

‘त्याला हवं तसं वागण्याचा आणि आमचं लग्न वाचवण्याचा मी खूप प्रयत्न केला इतंकच नाही तर माझ्या मॉडेलिंगच्या करिअरलाही मी सोडचिठ्ठी दिली. त्याच्या इच्छेखातर मी घराबाहेर पाऊलही ठेवलं नाही’ असंही ती म्हणाली. त्याचप्रमाणे शमीच्या कुटुंबियांनीदेखील आपल्याला मारहाण केल्याचं तिनं म्हटलं आहे. हे संपूर्ण प्रकरण तापल्यानंतर शमीनं ट्विट करत हे आपल्याविरुद्ध रचलेलं कटकारस्थान आहे तसेच आमच्या वैवाहिक जीवनाबदद्ल पसरवण्यात आलेल्या बातम्या या केवळ अफवा असल्याचं त्यानं ट्विट करत म्हटलं होतं. शमीवर त्याच्या पत्नीनं केलेले आरोप आणि सोशल मीडियावर हे प्रकरण गाजत असलेलं पाहता बीसीसीआयने देखील मोहम्मद शमीचा वार्षिक करार राखून ठेवला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mohammed shami attempted suicide in past claim wife hasin jahan