राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (२२ सप्टेंबर) दिल्लीतील एका मशिदीला भेट दिली. भागवत यांनी यावेळी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलयासी यांचीही भेट घेतली. दोघांमधील बंद दाराआडची ही बैठक जळवपास एक तास चालली. दरम्यान, मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर उमर अहमद इलयासी यांनी त्यांचा ‘राष्ट्रपिता’ म्हणून उल्लेख केला आहे.

हेही वाचा >> “मी पुरुष आहे, ईडी, सीबीआय मला..”, तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने उडवली सुवेंदू अधिकारींची खिल्ली

pankaja munde
“वर्गणी काढून मला घर बांधून द्या, मी मरेपर्यंत…”, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?
pm photo on electricity bill
वीज बिलावरील नेत्यांच्या छायाचित्रांना विरोध; समाजवादी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार
Arvind Kejriwal arrest was also noticed by important international media
अटकेची आंतरराष्ट्रीय माध्यमांकडूनही दखल

“मोहन भागवत यांना मी निमंत्रण दिले होते. माझ्या निमंत्रणानंतर ते आले होते. ते राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषी आहेत. त्यांच्या भेटीनंतर समाजात एक चांगला संदेश जाईल. देवाचे पूजन करण्याच्या आपल्या पद्धती वेगळ्या आहेत. मात्र मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे. देश सर्वप्रथम याला आम्ही महत्त्व देतो,” असे उमर अहमद इलयासी म्हणाले आहेत.

हेही वाचा >> सरसंघचालकांकडून दिल्लीत मशिदीला भेट, मुस्लीम नेत्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील एका मशिदीला आज भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी काही लोकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलयासी यांची भेट घेत साधारण एक तास चर्चा केली.

हेही वाचा >> Congress president election: ‘तो’ काय बाबा मोठ्ठा माणूस, आम्हाला राहुलच हवेत; शशी थरुरांकडे केरळमधल्या नेत्यांचीच पाठ

या भेटीनंतर देशातील धार्मिक सौहार्द वाढवण्यासाठी सरसंघचालक मुस्लीम बुद्धीजीवींना भेटत असल्याचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात येत आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर म्हणाले, “सरसंघचालक मोहन भागवत अनेक लोकांना भेटत आहेत. हा सातत्यापूर्ण ‘संवाद’ प्रक्रियेचा भाग आहे.”