Shocking Revelations about Iran’s Supreme Leader: इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्याबाबत अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने धक्कादायक खुलासा केला आहे. गुप्तचर यंत्रणेने ही माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सांगितली आहे. “मोजतबा खामेनी समलैंगिक असू शकतात. यामुळेच त्यांचे वडील दिवंगत अयातुल्ला अली खमेनी यांना इस्लामिक रिपब्लिकचे उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यास कचरत होते”, असे वृत्त न्यू यॉर्क पोस्टने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे.

ट्रम्प यांची प्रतिक्रिया

डोनाल्ड ट्रम्प यांना गुप्तचर यंत्रणेने मोजतबा खामेनी यांच्याबाबत ही माहिती दिल्यानंतर ट्रम्प मोठ्याने हसायला लागले, असे न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे. यावेळी बैठकीला उपस्थित असणारे सर्वच या माहितीवर जोरात हसू लागले. काही दिवसांपासून ही माहिती बाहेर आल्यानंतर अधिकारी यावर हसून प्रतिक्रिया देत असल्याचे सांगितले जात आहे.

अधिकाऱ्यांचा दावा

गुप्तचर विभागातील दोन जवळच्या व्यक्ती आणि व्हाईट हाऊसमधील एका अधिकाऱ्याने मोजतबा यांच्याबाबत हा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. तिन्ही अधिकाऱ्यांनी मोजतबा यांच्याबाबतची ही माहिती खरी असल्याचे म्हटले आहे. ५६ वर्षीय मोजतबा खामेनी यांची वडील अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिक्षकाबरोबर लैंगिक संबंध

मोजतबा खामेनी वडील अयातुल्ला यांच्याबरोबर अगदी जवळून काम करत होते. पडद्यामागून सूत्रे हलविण्यात त्यांचा हातकंडा होता, असे सांगितले जाते. दरम्यान, अमेरिकन गुप्तचर विभागाने केलेल्या खुलाशानुसार मोजतबा खामेनी हे समलिंगी होते शिवाय त्यांचे बालपणीच्या शिक्षकाबरोबर दिर्घकाळ लैंगिक संबंध होते, असे दावा केला जात आहे. या खुलाशामुळे जगभरात मोजतबा खामेनी यांच्याबाबत चर्चेला उधाण आले आहे. 

नपुंसकतेवर यूकेत उपचार?

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने केलेल्या या दाव्याचा ठोस पुरावा त्यांच्याकडून सादर करण्यात आलेला नाही. पण, सरकारच्या अगदी जवळच्या आणि खास सूत्रांनी याबाबत खात्रीलायक माहिती दिल्याचा दावा केला जात आहे. २००८ च्या विकिलीक्सने प्रकाशित केलेल्या एका अमेरिकन राजनैतिक अहवालात मोजतबा यांच्यावर नपुंसकतेसाठी यूकेमध्ये उपचार सुरू असल्याचे वर्णन केले होते. मोजतबा यांनी ३० व्या वर्षी लग्न केले त्यानंतर चार वर्षांनी त्यांना मुले झाल्याचेही सांगितले जाते, दरम्यान त्यापूर्वी चारवेळा त्यांनी युकेमध्ये उपचार घेतले असा दावा केला जात आहे.

समलैंगिकतेचा आरोप

सीबीएस न्यूजने रविवारी प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तात मोजतबा यांच्या समलैंगिकतेच्या आरोपाचा उल्लेख केला आहे. १९८९ पासून इराणवर राज्य करणाऱ्या अयातुल्ला खामेनी यांनी मोजतबा यांच्या याच कारणावरुन त्यांना उत्तराधिकारी म्हणून पसंती देत नव्हते. वडिलांसह इतरांना देखील याबाबत शंका होती, असेही सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या या वृत्तात म्हटले आहे.