Ayatollah Ali Khamenei funeral: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अंत्यविधी येत्या दोन-तीन दिवसांत पार पडणार आहे. यासाठी भारतातून नेत्यांना हजर राहण्याची विनंती केली असताना, खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनीच अंत्यविधीला उपस्थित राहण्याची शक्यता फार कमी आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मोजतबा वडील अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीला गैरहजर राहतील, अशी माहिती खामेनी यांचे भारतातील प्रतिनिधी, अयातुल्ला हकीम इलाही यांनी दिली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर पडण्यास मज्जाव

अयातुल्ला हकीम इलाही यांनी नुकतेच ‘इंडिया टुडे’ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बोलताना इलाही यांनी मोजतबा खामेनी वडील अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकणार नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. इस्रायलबरोबर अद्याप संबंध तणावपूर्ण असल्याने इलाही यांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. “मी गेल्या आठवड्यात इराणमध्ये होतो, मी तिथं मित्रांना भेटोलो ज्यांनी मोजतबा यांची भेट घेतली आहे. त्यांनी सांगितले की त्यांना बाहेर येऊन लोकांना भेटायचे आहे, पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना बाहेर येऊ दिले जाणार नाही”, असे इलाही म्हणाले.

अंत्यविधीला जगभरातून येणार लोक

मित्रांनी मला सांगितले हे खूप धोकादायक आहे आणि आपण त्यांना सुरक्षा देऊ शकत नाही, मला असं वाटतं की ते बाहेर पडणार नाहीत. असे इलाही यांनी पुढे स्पष्ट केले. अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यदर्शनासाठी जगभरातून हजारो नागरिक आणि दिग्गज हजेरी लावण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी संबंध तणावपूर्ण स्थितीत असताना अंत्यविधी पार पडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अयातुल्ला यांच्या मृत्यूमुळे इराणचे मोठे नुकसान झाल्याचे इलाही इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले.

अयातुल्लांचा मृत्यू इराणचे मोठे नुकसान

जगभरातून लोक अयातुल्ला अली खामेनी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत आहेत आणि हे आम्ही कधी विसरणार नाही, असे इलाही म्हणाले. “लोक आम्हाला धीर देण्यासाठी येत आहेत, ते आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे सांगण्यासाठी येत आहेत. आम्ही तुम्हाला कधी विसरणार नाही”, असे इलाही म्हणाले. “अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू इराणचे मोठे नुकसान आहे आणि हे नुकसान कधीही न भरुन निघणारे आहे”, असेही इलाही पुढे म्हणाले.