Mojtaba Khamenei IRGC News: अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी आणि डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ व सर्वोच्च नेते अधिकारी अली असघर हेजाझी यांच्यासह इराणच्या १० वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यासाठी १० दशलक्ष डॉलर्सपर्यंतचे बक्षीस जाहीर करत आहे.
हे सर्व अधिकारी इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) शी संबंधित आहेत आणि आयआरजीसीला त्यांची दहशतवादाती भूमिका आणि अमेरिकन नागरिकांवर हल्ले यासाठी २०१९ पासून परदेशी दहशतवादी संघटना जाहीर करण्यात आले आहे,
आयआरजीसी काय आहे?
- आयआरजीसीची (IRGC) स्थापना १९७९ मध्ये झाली असून, इराणचे परराष्ट्र धोरण आणि अर्थव्यवस्थेत या संघटनेने मोठे वर्चस्व स्थापन केले आहे.
- अमेरिकेने २०१९ पासून या संघटनेला परदेशी दहशतवादी संघटना जाहीर केले आहे.
- आयआरजीसीला कोणत्याही अमेरिकन व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
- आयआरजीसीला ‘मटेरियल सपोर्ट’ पुरवणे हा अमेरिकन कायद्याअंतर्गत गुन्हा मानला जातो.
- इराणच्या अंतर्गत राजकारणात आणि अर्थव्यवस्थेवर या गटाचे प्रचंड नियंत्रण आणि प्रभाव आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये, इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांच्यासह ‘इराणी दहशतवादी नेते’ असे वर्णन करण्यात आलेल्या व्यक्तींबद्दल माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यास १० दशलक्ष डॉलर्सपर्यंतचे बक्षीस मिळू शकते, असेही सांगण्यात आले आहे. तसेच या सूचनेमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, जे लोक या अधिकार्यांबद्दल किंवा त्यांच्या नेटवर्कबद्दल विश्वासार्ह माहिती देतील, त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत केली जाईल.
सार्वजनिकरित्या करण्यात आलेल्या या अवाहानात म्हटले आहे की, पोस्टमध्ये नावे देण्यात आलेले लोक हे आयआरजीसीमधील विविध घटकांचे नेतृत्व आणि संचालन करतात आणि अमेरिकेकडून त्यांच्यावर परदेशात कारवायांची आखणी आणि अंमलबजावणी करण्याचे आरोप ठेवण्यात आलेले आहेत.
मोजतबा खामेनी यांच्याबरोबरच यामध्ये इराणच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये गुप्तचर विभागाचे मंत्री इस्माईल खातीब, डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ अली असघर हेजाझी, मेजर जनरल याह्या रहीम सफावी, इंटेरियर मंत्री एस्कंदर मोमेनी आणि सुप्रीम नॅशनल सेक्युरिटी कौन्सिल सेक्रेटरी अली लारीजानी यांचा समावेश आहे.
“हे व्यक्ती इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) विविध घटकांचे नेतृत्व आणि संचालन करतात, जी संघटना जगभरात दहशतवादाची योजना आखतात, त्याचे आयोजन आणि अंमलबजावणी करतात,” असे या प्रोग्रामद्वारे पोस्ट करण्यात आलेल्या बॅनरमध्ये म्हटले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या ‘डिप्लोमॅटिक सिक्युरिटी सर्व्हिस’द्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘रिवॉर्ड्स फॉर जस्टिस प्रोग्राम’मध्ये म्हटले आहे की यांच्याबद्दल माहिती असलेले लोक एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप्लिकेशन्स किंवा टॉर नेटवर्कवरील सुरक्षित चॅनेलद्वारे प्रोग्रामशी संपर्क साधू शकतात.
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमालीचा वाढलेला असतानाच ही घोषणा करण्यात आली आहे. याद्वारे एकप्रकारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनारडून आयआरजीसीशी संबंधित इराणच्या सुरक्षा आणि गुप्तचर नेटवर्कवरील दबाव वाढवला जात आहे.
