Mojtaba Khamenei Viral Video Fact Check reveals the truth behind the viral footage amid Iran-Israel tension : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. यादरम्यान सध्या सोशल मीडियावर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये खामेनी हे एका हाय-टेक कमांड सेंटरमध्ये चालत जात असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नाही तर, त्यामध्ये समोर असलेल्या स्क्रीनवर इस्रायलचे डिमोना न्युक्लिअर रिअॅक्टर दाखवले जात आहे. दरम्यान हा व्हिडीओ खरा नसल्याची बाब पडताळणीमधून समोर आली आहे.
दरम्यान मोजतबा खामेनी हे एका लष्करी ऑपरेशन रूममध्ये जात असल्याचा दावा करणारा हा व्हायरल व्हिडीओ एआय जनरेटेड असल्याचे ग्रोक (Grok) ने स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही विश्वासार्ह स्त्रोताने हा व्हिडीओ खरा असल्याचा दुजोरा दिलेला नाही.
इराणच्या माध्यमांकडून कोणतेही वृत्त नाही
जीबीएक्स प्रेसने (GBX_Press) सुरूवातीला हा व्हिडीओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता. या पेजने हा व्हिडीओ ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून चालवला. तसेच म्हटले की, “तेहरानने एक नवीन व्हिडीओ जारी केला आहे, ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी पहिल्यांदाच मिलिटरी ऑपरेशनरूमकडे जाताना दिसत आहेत.”
मात्र इराणच्या सरकारी माध्यमांनी, जसे की इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सी (IRNA), इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग (IRIB), किंवा तासनिम न्यूज एजन्सी, यांनी या व्हिडीओच्या सत्यतेची पुष्टी केलेली नसल्याचे ग्रोकने सांगितले.
रॉयटर्स, बीबीसी आणि सीएनएन यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय माध्यमांनी देखील इराण सरकारद्वारे अशा प्रकारचा कोणताही व्हिडीओ प्रसिद्ध करण्याच आल्याचे किंवा मोजतबा खामेनी हे समोर आल्याचे कोणतेही वृत्त दिलेले नाही.
ग्रोकसारख्या ओपन-सोर्स इंटेलिजन्सने स्पष्ट केले की, २०२६ च्या सुरुवातीला त्यांचे वडील अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर पदभार स्वीकारल्यापासून मोजतबा खामेनी हे एकदाही अधिकृतपणे लोकांसमोर आलेले नाहीत आणि त्यांनी आजवर फक्त लेखी स्वरूपातील निवेदने जारी केली आहेत.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेत तणाव कमालीचा वाढलेला आहेस, यादरम्यान खामेनी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याबरोबरच इस्रायलमधील डिमोना न्यूक्लिअर रिअॅक्टरचे फोटो व्हिडीओमध्ये दिसून आल्याने युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
व्हिडीओ एआय-जनरेटेड
ग्रोकने केलेल्या विश्लेषणानुसार, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये असे अनेक खुणा आढळल्या आहेत, ज्यावरून व्हिडीओ एआय वापरून तयार करण्यात आल्याचे किंवा त्यात काही बदल करण्यात आल्याचे दिसून येते
फ्रेम-बाय-फ्रेम पडताळणी केली असता या व्हिडीओ फुटेजमधीस काही भाग हा अली खामेनी यांच्या मृत्यूच्या आधीच्या जुन्या व्हिडीओशी काहीसा जुळणारा आहे, असे ग्रोकने सांगितले. तसेच एका नवीन ठिकाणाचा आभास निर्माण करण्यासाठी या जुन्या व्हिडीओवर डिजिटल ओव्हरलेज जोडले गेले आहेत.
तसेच व्हिडीओमध्ये ब्लर केलेले चेहरे, नैसर्गिक न वाटणारी लायटिंग, आणि ग्लिचसारखे ट्रान्झिशन्स अशा काही विसंगती दिसत असल्याचे मत ग्रोकने व्यक्त केले आहे. सामान्यत: हे मार्कर व्हिडीओ हा एआय जनरेटेड असल्याचे किंवा तो मोठ्या प्रमाणात एडिट केलेला असल्याची सुचवतात.
DW आणि MEMRI सारख्या फॅक्ट-चेकिंग संस्थांनी यापूर्वीही प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी एआयचा वापर करून तयार केलेले असे अनेक प्रोपगंडा स्टाईल व्हिडीओ जारी करण्यात आले असल्याचे नोंद केली आहे.
