Monalisa मोनालिसा अर्थात मोनी भोसले ही कुंभमेळ्यात रुद्राक्ष माळा विकणारी मुलगी चांगलीच चर्चेत आली आहे. तिचे डोळे, तिचं सौंदर्य या सगळ्यांमुळे ती व्हायरलही झाली आहे. मोनालिसा या रुद्राक्ष विकणाऱ्या मुलीने आता एक गंभीर आरोप केला आहे. मात्र तिच्या सौंदर्यामुळे आणि तिचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने तिच्या उदरनिर्वाहाच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान तिने काही लोक सक्तीने ती बसली होती त्या तंबूत आले आणि भावाला मारहाण केली असा आरोप केला आहे.

काय आरोप केला आहे मोनालिसाने?

काही लोक मी बसले होते त्या तंबूत आले. मला त्यांनी सांगितलं की आम्हाला तुझ्या वडिलांनी पाठवलं आहे. तुझ्याबरोबर आम्हाला फोटो काढायचे आहेत. मी त्यांना नकार दिला त्यांना मी म्हटलं की माझ्या वडिलांनी तुम्हाला पाठवलं असेल तर तुम्ही त्यांच्याकडेच जा. मी तुमच्यासह फोटो काढणार नाही.” हे सगळं बोलत असताना तिचे वडील आले. त्यांना मोनिलासाने ( Monalisa ) विचारलं असता मी कुणालाही तुझ्याकडे पाठवलं नाही असं त्यांनी सांगितलं. तसंच माझे वडील आलेल्या लोकांना ओरडले.

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Chunky Panday
चंकी पांडेंचे बालपणीचे सर्व फोटो फ्रॉकमध्ये का आहेत? स्वत: सांगितलं कारण; म्हणाले, “आई-वडिलांना”
mamata kulkarni News
Mamata Kulkarni : ममता कुलकर्णीचं वक्तव्य; “असं वाटलं की आत्महत्या करावी, मी अनेकदा प्रयत्नही…”
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
Viral Girl Monalisa in Kumbhmela
Monalisa : व्हायरल गर्ल मोनालिसाला मिळाला हिंदी चित्रपट, ‘या’ दिग्दर्शकाने घरी जाऊन घेतली भेट
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”

त्या लोकांनी माझ्या भावाला मारहाण केली-मोनालिसा

मोनालिसा ( Monalisa ) पुढे म्हणाली “ते लोक सक्तीने तंबूमध्ये शिरले आणि फोटो काढू लागले. त्यावेळी माझा भाऊ तिथे होता, त्याने हा प्रकार पाहिला तो चिडला आणि त्याने आलेल्या लोकांचे फोन हिसकावून घेतले. त्यातले माझे फोटो तो डिलिट करु लागला. तेव्हा त्या सगळ्या लोकांनी त्याला मारहाण केली.” असा आरोप मोनिलासाने ( Monalisa ) केला आहे. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.

मोनालिसाच्या आजोबांनी काय सांगितलं?

मोनिलासाचा ( Monalisa ) एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे कुंभमेळ्या एवढीच तिचीही चर्चा रंगली. मोनालिसाचं सौंदर्य खरोखरच अप्रतिम आहे. मात्र तिला फोटो काढण्यासाठी, व्हिडीओसाठी, तिच्याशी बातचीत करण्यासाठी अक्षरशः त्रास दिला जातो आहोत. मोनालिसा माळा विक्रीचं काम करते पण तिच्या या व्यवसायावरही या सगळ्यामुळे परिणाम झाला आहे. प्रयागराजमध्ये गेल्यानंतर तिला प्रसिद्धी मिळाली. पण या प्रसिद्धीचा परिणाम तिच्या पोटापाण्याच्या व्यवसायावर होतो आहे. लोक तिला पाहिलं की तिच्या मागे लागतात. तिला त्रास देतात. त्यामुळे तिची माळा विक्री राहूनच जाते. असं मोनालिसाच्या आजोबांनी सांगितलं.

तिच्या सौंदर्याची भुरळ अनेकांना पडली आहे. मोनालिसा अवघ्या १६ वर्षांची आहे. तिला जी प्रसिद्धी मिळाली त्यापेक्षाही तिला उदरनिर्वाहासाठी जो व्यवसाय ती करते तो अधिक महत्त्वाचा वाटतो तिने काही दिवसांपूर्वी हे माध्यमांनाही सांगितलं आहे. मोनालिसाचं ( Monalisa ) खरं नाव मोना भोसले असं आहे. ती इंदूरची आहे. तिच्या सौंदर्याची तुलना मोनालिसाच्या सौंदर्याशी केली गेल्याने तिला कुंभमेळ्यातली मोनालिसा ( Monalisa ) असं म्हटलं गेलं आहे.

Story img Loader