scorecardresearch

‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत रेल्वे कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप; पगारातून कपात होणार ‘एवढे’ रुपये

महत्त्वाचे म्हणजे हेच राष्ट्रध्वज मुख्य पोस्ट ऑफिसमधून २५ रुपयांना, तर बचत गटामार्फेत २० रुपयांना विकल्या जात आहे.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत रेल्वे कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप; पगारातून कपात होणार ‘एवढे’ रुपये
संग्रहित छायचित्र

‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, त्याचे पैसे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्यात येईल. प्रतिध्वज ३८ रुपये एवढी रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात होणार आहे. याला रेल्वे कर्मचारी संघटनेने मात्र विरोध केला आहे.

हेही वाचा – फ्रेंडशिप दिनी अमृता फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटो केला शेअर, म्हणाल्या “ये दोस्ती…”

“रेल्वे कर्मचाऱ्यांना जो ध्वज देण्यात येईल, त्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून ३८ रुपये कापले जातील, असा आदेश जारी करण्यात आला आहे.”, अशी माहिती रेल्वेचे सीपीआरओ शिवम शर्मा यांनी दिली आहे. तर “हा ध्वज कर्मचारी लाभ निधीतून दिला जात आहे. त्याचे पैसे नंतर कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्यात येईल आणि ही रक्कम कर्मचारी लाभ निधीमध्येच हस्तांतरित केली जाईल. त्यामुळे पगारातून पैसे कापले जाऊ नयेत.”, अशी प्रतिक्रिया रेल्वेचे विभागीय मंत्री चंदन सिंह यांनी दिली आहे.

हेही वाचा – “आमदार शिंदे गटातून बाहेर पडणार,” अजित पवारांचा दावा, शहाजीबापू म्हणाले “त्यांना राजकारणापेक्षा भविष्यात…”

महत्त्वाचे म्हणजे हेच राष्ट्रध्वज मुख्य पोस्ट ऑफिसमधून २५ रुपयांना, तर बचत गटामार्फेत २० रुपयांना विकल्या जात आहे. १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारत आपला ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमही त्याचाच एक भाग आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Money will deduct from railway employees salary for tricolour distributed under har ghar tiranga campaign spb