माकडाच्या दगडफेकीत पुजाऱयाचा मृत्यू

बिहारच्या पाटण्यात माकडाने एकाचा जीव घेतल्याची विचित्र घटना

संग्रहित

बिहारच्या पाटण्यात माकडाने एकाचा जीव घेतल्याची विचित्र घटना घडली आहे. माकडाने केलेल्या दगडफेकीत मंदिराच्या पुजाऱयाचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण्यातील सिटी चौक परिसरातील मिरचाई गल्लीत माकडांनी गेल्या काही दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. येथील मंदिराचा पुजारी मंदिर परिसरात साफसफाई करत असताना माकडाने पुजाऱयावर दगड मारायला सुरूवात केली. माकडाने मारलेला दगड डोक्यावर बसल्याने पुजारी जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली असून लहान मुलांमध्येही भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांकडून माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Monkey allegedly killed priest of temple