पीटीआय, कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली या हिंसाचारग्रस्त गावामध्ये सरकारतर्फे उभारण्यात आलेल्या शिबिरांमध्ये एक हजार २५०पेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी साधारण ४०० तक्रारी जमिनीच्या वादासंबंधी आहेत. स्थानिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रशासनाने लोकांपर्यंत पोहोचण्याची मोहीम हाती घेतली आहे.स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे जमिनींवरील अतिक्रमण आणि लैंगिक अत्याचारांविरोधात करण्यात आलेल्या हिंसक निदर्शनांच्या केंद्रस्थानी असलेल्या संदेशखाली मंडल २ येथे सर्वाधिक म्हणजे जवळपास एक हजार तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी
Loksatta vasturang Exemption in stamp duty and fine
मुद्रांक शुल्क व दंडात सवलत
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक
Police-Naxalite encounter on Chhattisgarh border plans of the Naxals to cause an accident were foiled
छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात…

दरम्यान, पश्चिम बंगालचे मंत्री सुजीत बोस आणि पार्थ भौमिक यांनी शनिवारी संदेशखालीला जाऊन तेथील पाहणी केली. तर माकपच्या नेत्या मीनाक्षी मुखोपाध्याय यांना संदेशखालीला जाण्यापासून अडवण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकानेही सलग दुसऱ्या दिवशी परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुवेंदू अधिकारी यांनी संदेशखालीची तुलना २००७-०८मधील नंदीग्रामच्या परिस्थितीशी केली.