scorecardresearch

UP : १५ मुलं आणि काही महिलांना ठेवलं ओलीस, गोळीबाराचाही आवाज

आरोपीने कोणतीही मागणी केलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं

एका माथेफिरुने उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद या ठिकाणी १५ मुलं आणि काही मुलांना ओलीस ठेवलं आहे. एएनआयने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या माथेफिरुने १५ मुलं आणि काही महिलांना ओलीस करुन घरात ठेवलं आहे. या घरातून गोळीबाराचे आणि बॉम्बचेही आवाज आले आहेत अशीही माहिती समोर आली आहे. ANI ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

ओलीस ठेवण्यात आलेल्या मुलांना आणि महिलांना सोडवण्यासाठी एटीएसच्या कमांडोंनाही पाचारण करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड तासाभरापासून गोळीबार सुरु आहे. आयजी रेंज मोहीत अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. आरोपीने आत्तापर्यंत कोणतीही मागणी केलेली नाही असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

ज्या माथेफिरुने मुलांना आणि महिलांना घरात ओलीस ठेवलं आहे त्याच्या मुलीचा वाढदिवस होता. त्याने वाढदिवसाच्या निमित्ताने या सगळ्यांना आपल्या घरी बोलावलं होतं. मात्र नंतर त्याने देशी कट्टा आणि बॉम्ब यांच्या मदतीने या सगळ्यांना ओलीस ठेवलं आहे. पोलिसांवर या माणसाने तीन हातबॉम्ब फेकले. ज्यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत असंही एएनआयनं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: More than 15 children and a few women have been held hostage at a house by a man scj

ताज्या बातम्या