रशियातील मॉस्कोहून गोव्याच्या दिशेने येणारं विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धमकीचा इ-मेल गोल्यातील डाबोलिम विमानतळ प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलंत हे प्रवासी विमान उझबेकिस्तानच्या दिशेने वळवलं आहे. या विमानावर तब्बल २४० प्रवासी होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर तपास लागलीच सुरू करण्यात आला आहे. याआधीही १० जानेवारी रोजी अशाच प्रकारची धमकी मॉस्को-गोवा विमानासंदर्भात देण्यात आली होती.

नेमकं काय घडलं?

Moscow-Goa AZV2463 हे प्रवासी विमान आज पहाटे ४ वाजून १५ मिनिटांनी दक्षिण गोव्यातील डाबोलिम विमानतळावर उतरणार होतं. मात्र, रात्री साडेबाराच्या सुमारास डाबोलिम विमानतळाच्या संचालकांना त्यांच्या ई-मेल आयडीवर विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आला. त्यामुळे विमान भारतीय हवाई हद्दीत शिरण्याआधीच हे उझबेकिस्तानकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

pune airport marathi news
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…
Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द
serious allegations against boeing
अन्वयार्थ : बडयांवर बडग्याची बाजारकेंद्री ‘संस्कृती’
Plane Crash Viral Video
विमानाचा अपघात होण्याच्या काही सेंकद आधी प्रवाशांनी मारल्या उड्या; थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा Viral Video

महिन्याभरात दुसऱ्यांना आली बॉम्बस्फोटाची धमकी!

खरंतर याआधीही मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या प्रवासी विमानाला अशीच बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. १० जानेवारी रोजी अशी धमकी मिळाल्यानंतर Azur Air विमान गुजरातच्या जामनगर विमानतळाकडे वळवण्यात आलं. विमानातील सर्व २३६ प्रवाशांना खाली उतरवून सर्व लगेज बॅग आणि विमानाची कसून तपासणी केल्यानंतर विमानावर कोणतीही बॉम्बसदृश गोष्ठ आढळून आली नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. या सगळ्या प्रकारात विमानातील प्रवाशांना मात्र आख्खी रात्र जामनगर विमानतळावर काढावी लागली होती.