मोठी बातमी! कुख्यात दहशतवादी, लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक | Most wanted terrorist Ludhiana court bomb blast case main conspirator arrested | Loksatta

मोठी बातमी! कुख्यात दहशतवादी, लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

कुख्यात दहशतवादी आणि पंजाबमधील लुधियाना कोर्ट स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मोठी बातमी! कुख्यात दहशतवादी, लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
पंजाब लुधियाना कोर्ट स्फोट (फोटो- एएनआय)

कुख्यात दहशतवादी आणि पंजाबमधील लुधियाना कोर्ट स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. एनआयएने दिल्लीच्या विमानतळावर ही कारवाई केली आहे. अद्याप या दहशतवाद्याचे नाव समोर आलेले नाही. २३ डिसेंबर २०२१ रोजी लुधियाना कोर्टात भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा >>> पंजाबच्या लुधियाना कोर्टात स्फोट; एक ठार, चार जण जखमी! स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार एका कुख्यात दहशतवाद्याला दिल्लीच्या विमानतळावर अटक करण्यात आली आहे. हा दहशतवादी लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. एनआयएने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. या दहशतवाद्याचे नाव अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही.

लुधियाना कोर्टात तेव्हा काय घडले होते?

हेही वाचा >>> ‘द काश्मीर फाइल्स’ला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ म्हणणाऱ्या लॅपिड यांनी मागितली माफी; म्हणाले, “काश्मिरी पंडितांचा…”

पंजाबच्या लुधियाना कोर्टामध्ये २३ डिसेंबर २०२१ रोजी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता. तर चार जण जखमी झाले होते. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्यामुळे न्यायालयातच्या भितींना तडे गेले होते. तर बाजूच्या खिडक्यांच्या काचादेखील फुटल्या होत्या. न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेनंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 09:11 IST
Next Story
VIDEO: “…म्हणून काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देणं सुरू केलं”, देवेंद्र फडणवीसांचा गुजरातमध्ये हल्लाबोल