MP Dalit Couple Beaten Tied To Pole: मध्य प्रदेशातील अशोक नगर जिल्ह्यातील एका गावात शुक्रवारी एका वृद्ध दलित जोडप्याला खांबाला बांधून गावकऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या जोडप्याला मारहाणीनंतर ग्रामस्थांनी चपलांचा हार घातला होता. इंडियन एक्सस्प्रेसने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याचा मुलगा काही महिन्यांपूर्वी लैंगिक छळाच्या प्रकरणात अडकला होता. यामुळे पीडित कुटुंबातील संतप्त सदस्यांनी जोडप्यावर हल्ला केला असावा असा संशय आहे.

पोलिस काय म्हणाले?

उपविभागीय पोलीस अधिकारी (मुंगोली) सनम बी खान यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “काही महिन्यांपूर्वी या जोडप्याचा मुलगा विनयभंगाच्या घटनेत आरोपी होता व त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे महिलेच्या कुटुंबातील सदस्य प्रचंड भडकले होते. याच रागातून त्यांनी संबंधित दाम्पत्याला मारहाण केली. आम्ही दाम्पत्याने केलेल्या आरोपांची चौकशी करत आहोत. १० जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपींना पकडण्यासाठी शोध सुरू आहे.”

Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Mohammad Mokhbe next iran president
इस्रायलशी युद्ध छेडणाऱ्या इराणमध्ये खळबळ; अध्यक्षांच्या अपघाती मृत्यूनंतर मोहम्मद मोखबर होणार अंतरिम अध्यक्ष
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
navi Mumbai lok sabha voting
Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live: महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान!
Ruskin Bond
“परदेशी लोकांसारखा दिसतो म्हणून माझ्याकडून…”, प्रसिद्ध भारतीय लेखकाने व्यक्त केली खंत
Iran President Ebrahim Raisi Died in Helicopter Crash in Marathi
Ebrahim Raisi Helicopter Crash: इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, देशावर शोककळा

पोलिसांनी सांगितले की, मुलावर विनयभंगाचा आरोप लागल्यावर या जोडप्याने त्यांचे मुंगोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किलोरा गाव सोडले होते. प्रकरण थोडे निवळल्याचे वाटल्यावर ते शुक्रवारीच परतले होते. परत आल्याचे समजताच ६५ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या ६० वर्षीय पत्नीला खांबाला बांधून काहींनी मारहाण केली त्यांना चपलांचा हार घालायला लावला.

पीडितांनी सांगितला घटनाक्रम

स्थानिक जिल्हा रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना पीडित (मारहाण झालेल्या वृद्धाने) सांगितले की, “आम्ही मजुरीचे काम करण्यासाठी गावाबाहेर गेलो होतो. पण जेव्हा आम्ही आमच्या घरी परतलो, तेव्हा १० ते १२ लोकांनी आमच्या घरात घुसून आम्हाला मारहाण केली आणि आम्हाला दोरीने बांधून त्यांच्या घरी नेले. तिथे त्यांनी आम्हाला एका खांबाला बांधले, आधी बेदम मारहाण केली आणि नंतर चपलांचा हार घालायला लावला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी येऊन तिथून आमची सुटका केली. “

हे ही वाचा<< Video: गायीचा मृतदेह जीपला बांधून भीषण आंदोलन; मुस्लिमांनी गोहत्या केल्याचा दावा, भयंकर घटनेची संपूर्ण खरी बाजू वाचा

दरम्यान, मारहाण झालेल्या जोडप्याने असाही आरोप केलाय की, मारण्यासाठी आलेल्या आरोपींनी त्यांच्या जमिनीत पेरलेल्या पिकाची सुद्धा नासधूस केली. याशिवाय, कुलूप तोडून घरातील सामानाची सुद्धा तोडफोड केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शनिवारी भारतीय दंड संहिता कलम १४७ (दंगल घडवणे), १४९ (उद्देशपूर्ण बेकायदेशीर सभा), ३२३ (स्वेच्छेने दुखापत करणे), २९४ (अश्लील कृत्य) आणि ५०६ (धमकी), तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या तरतुदीनुसार १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.