संसदेत निघालेल्या हेमा मालिनी यांच्या हातात हरसिमरत कौर यांनी दिली गव्हाची ओंबी अन् म्हणाल्या…

हरसिमरत कौर यांनी हेमा मालिनींना गव्हाची ओंबी भेट देऊ केली आणि त्यांना शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यास सांगितलं.

harsimrat kaur
हरसिमरत कौर यांनी हेमा मालिनींना दिली गव्हाची ओंबी
केंद्र सरकारनं पारित केलेल्या तीन कृषी विधेयकांवरून गेल्या सहा ते सात महिन्यांपासून शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. शेतकरी नेते आणि सरकारमध्ये बैठकीच्या अनेक फेऱ्या झाल्या, मात्र तरीही आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. सरकारने कृषी कायदे मंजूर केल्यानंतर विरोध करत शिरोमणी अकाली दल भाजपासोबत युतीतून बाहेर पडला. तर खासदार आणि अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी हरसिमरत कौर आणि भाजपा खासदार हेमा मालिनी यांची संसदेबाहेर भेट झाली. यावेळी हरसिमरत कौर यांनी हेमा मालिनींना गव्हाची ओंबी भेट देऊ केली आणि त्यांना शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यास सांगितलं.

हेमा मालिनी संसदेत प्रवेश करत असताना हरसिमरत कौर त्यांना गव्हांची ओंबी सोपवली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यास सांगितलं. कौर यांनी हातातील फलक उलटे करून हेमा मालिनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत असल्याचा दावा केला. त्यानंतर हेमा मालिनी हसल्या व संसदेत निघून गेल्या.

दरम्यान, सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून यावेळी सरकारला कोडींत पकडण्यासाठी विरोधकांकडून व्यूहरचना आखली जात आहे. पेगॅसस प्रकरणावरुन संसदेत गदारोळ घालत सरकारला जाब विचारणारे विरोधक एकवटले असून यावेळी पुढील रणनीती आखण्यात आली असं बोललं जात आहे. एकीकडे पेगॅसस प्रकरणामुळे गदारोळ सुरु असताना आसाम-मिझोराम सीमेवर रक्तरंजित संघर्षावरुनही विरोधक आक्रमक झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mp harsimrat kaur badal hands over wheat stalk to bjp mp hema malini outside parliament hrc