पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यात देशी श्वानांचा सामावेश करण्यात आला आहे. कर्नाटकातील मुधोल हाऊंड (Mudhol hound) श्वान पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यात दिसणार आहेत. मुधोल हाऊंड हे आधीच भारतीय हवाई दल आणि इतर सरकारी विभागात सेवा देत आहेत. मात्र, पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) च्या श्वान पथकात या शिकारी श्वानांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- गडकरींना स्थान देण्यात न आलेल्या संसदीय मंडळाची घोषणा केल्यानंतर स्वामींचा भाजपाला घरचा आहेर; म्हणाले “आता सगळं मोदीच…”

श्वानांचे प्रशिक्षण सुरु

एप्रिल महिन्यात कॅनाइन रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सेंटर तिम्मापूर इथून दोन पुरुष प्रजातीचे श्वान आणण्यात आले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच या श्वानांचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. चार महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर त्यांचा पंतप्रधानांच्या सुरक्षा दलातील श्वान पथकात सामावेश करण्यात येणार आहे.

काय आहे या श्वनांचे वैशिष्ट

कर्नाटकातील बागलकोट भागातील मुधोळ परिसरात हे श्वान आढळून येते. विशेष कार्यशक्ती आणि शिकार करण्यात तरबेज अशी या श्वानाची ओळख आहे. जर्मन शेफर्ड श्वानापेक्षा मुधोल हाऊंड श्वान जास्त वेगवान मानला जातो. देशी प्रजातीच्या श्वानांमध्ये मुधोळ हाउंड्स ही सर्वात शिकारी गुणवत्ता, निष्ठावान आणि निरोगी प्रजाती मानली जाते. त्यामुळेच पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील श्वान पथकात मुधोल हाऊंड प्रजातीच्या श्वानांचा सामावेश करण्यात आला आहे. भारतीय हवाई दलात आणि आता SPG पथकातही या श्वानांचा सामावेश करण्यात आला आहे.

या श्वानांचा बांधा उंच आणि काटक असतो. कान लांब आणि शेपूट जमिनीपर्यंत पोहचते. स्वभावाने हे श्वान प्रचंड रागीट असतात. ओळखीच्या स्पर्शाशिवाय यांना दुसऱ्या कोणाचाही स्पर्श सहन होत नाही. उंचीमुळे हे श्वान इतर श्वानांपेक्षा वेगळी दिसतात. जर्मन शेफड श्वान जे काम ९० सेकंदात पूर्ण करतात तेच काम मुधोळ हाउंड्स केवळ ४० सेकांदात पूर्ण करतात.

हेही वाचा- CBI कारवाईनंतर केजरीवाल संतापले, न्यूयॉर्क टाइम्सचा फोटो केला ट्वीट, म्हणाले “जग कौतुक करत असताना…”

मोदींकडून ‘मन की बात’मध्ये मुधोळ हाऊंड श्वानांचा उल्लेख

पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये मुधोल हाऊंड श्वानांचा उल्लेख केला होता. “जर या प्रजातीच्या श्वानांना घरातही पाळलं तर भारतीय श्वानांच्या प्रजातींना प्रोत्साहन मिळेल आणि स्वावलंबी भारत घडवण्यासाठी ते आवश्यक आहे, असं ते मोदी म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mudhol hound dogs join dog squad of prime minister modis security system dpj
First published on: 19-08-2022 at 15:43 IST