नवी दिल्ली : भारताचे पॅलेस्टाईनमधील राजदूत मुकुल आर्या यांचे रविवारी रामल्लाह येथे निधन झाले, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटरवर दिली. जयशंकर यांनी म्हटले आहे की, ‘‘आर्या यांच्या निधनामुळे आपणास धक्का बसला आहे. ते अत्यंत कर्तबगार अधिकारी होते.’’ त्यांनी दिल्लीत परराष्ट्र खात्यात तसेच युनेस्कोत भारताच्या कायमस्वरूपी शिष्टमंडळात, त्याचप्रमाणे भारताच्या काबूल आणि मॉस्को दुतावासात काम केले होते. पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र खात्याने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
