Mukul Rohatagi rejection post Attorney General center government proposal ysh 95 | Loksatta

‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार

देशाचे अ‍ॅटर्नी जनरल होण्यास ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यांनी नकार दिला आहे. केंद्र सरकारने या महिन्याच्या सुरूवातीला त्यांना हे पद स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला होता.

‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार
मुकूल रोहतगी

पीटीआय, नवी दिल्ली : देशाचे अ‍ॅटर्नी जनरल होण्यास ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यांनी नकार दिला आहे. केंद्र सरकारने या महिन्याच्या सुरूवातीला त्यांना हे पद स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला होता. आपल्या नकारामागे कोणतेही विशेष कारण नसल्याचे रोहतगी यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे २०१४ ते २०१७ या काळात अ‍ॅटर्नी जनरल राहिलेल्या रोहतगी यांच्याकडे सरकारने विचारणा केली होती. रोहतगी यांच्या नकारानंतर सरकार काय पाऊल उचलणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

रोहतगी यांच्यानंतर वेणूगोपाल अ‍ॅटर्नी जनरल झाले होते. २०२० साली त्यांची ३ वर्षांची मुदत संपली. मात्र महत्त्वाचे खटले लक्षात घेता आणखी एक वर्षांची मुदतवाढ घेण्याची सरकारने विनंती केली. ती वेणूगोपाल यांनी मान्य केली होती. आता पुन्हा ९१ वर्षांच्या वेणूगोपाल यांनी वयोमानामुळे आणि वैयक्तिक कारणांमुळे मुदतवाढ घेण्यास नकार कळवला आहे. 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
चंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा

संबंधित बातम्या

Gujarat Election Exit Polls : भाजपा, काँग्रेस की आप? गुजरातमध्ये कोण बाजी मारणार, कोणाला किती जागा? वाचा एक्झिट पोल…
MCD Exit Poll: दिल्ली महापालिका निवडणुकीत ‘आप’कडून भाजपाला धोबीपछाड, काँग्रेसचा सुपडासाफ
VIDEO : ‘भारत जोडो’ यात्रेत ‘मोदी-मोदी’च्या घोषणा; राहुल गांधींचं एकदम हटके प्रत्युत्तर
पुतिन राहत्या घरात पायऱ्यांवरुन पडले? शासकीय निवासस्थानी घडलेल्या प्रकारानंतर आरोग्यसंदर्भातील चर्चांना उधाण
“…ही नवीन ‘नग्नता’ आहे का?”; पंतप्रधान मोदींचे २० फोटो शेअर करत प्रकाश राज यांची पोस्ट

व्हिडिओ

ताज्या बातम्या
उदय सामंत यांनी दिली जत तालुक्यातील गावांना भेट, स्थानिकांनी मांडल्या व्यथा!
सांगली: वाळवा तालुक्यात ऊसाच्या फडात आढळला जखमी रानगवा; उपचारानंतर नैसर्गिक आधिवासात सोडणार
Team India: राहुल द्रविडची प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी? बीसीसीआयकडून हालचालींना वेग
Himachal Pradesh Election Exit Poll : हिमाचलमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत; सत्ता परिवर्तनाची परंपरा कायम राहण्याची चिन्ह!
महाराष्ट्र तोडण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न होतोय; उद्धव ठाकरेंचा नाव न घेता भाजपावर हल्ला