आई चार दिवस करत राहिली पार्टी; भुकेने व्याकूळ चिमुकल्याने पाळण्यातचं सोडला जीव

आई मुलांसाठी प्रत्येक त्याग करण्यास तयार असते. परंतु रशियामधील एका २५ वर्षीय निर्दयी महिलेने आपल्या मुलांसाठी असे काही केले की सर्वानां आश्चर्याचा धक्का बसला.

mum murdered baby in russia
आई ४ दिवस करत होती दारू पार्टी, बंद खोलीत भुकेने व्याकूळ असलेल्या बाळाचा पाळण्यातचं मृत्यू (file photo)

आई मुलांसाठी प्रत्येक त्याग करण्यास तयार असते. परंतु रशियामधील एका २५ वर्षीय निर्दयी महिलेने आपल्या मुलांसाठी असे काही केले की सर्वानां आश्चर्याचा धक्का बसला. मिरर या वेबसाइटच्या वृत्तानुसार, मित्रांसह दारू पार्टी करण्यासाठी निर्दयी महिलेने ११ महिन्यांचा मुलगा आणि तीन वर्षाचा मुलीला घरात एका खोलीत बंद केले. चार दिवसांपासून भुकेने व्याकूळ असलेल्या मुलाचा अखेर पाळण्यातचं मृत्यू झाला, तर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात कोर्टाने महिलेला दोषी ठरवले आहे.

रशियाच्या झ्लाटॉस्टमधील २५ वर्षीय महिला ओल्गा बजरोवा आपल्या पतीपासून वेगळी राहते. मित्रांसह दारू पार्टी करण्यासाठी तीने आपल्या निर्दोष मुलांना मृत्यूच्या दारात ढकलले. ती आपला ११ महिन्यांचा मुलगा सेवली आणि ३ वर्षांचा मुलीला घरातच बंद ठेवून पार्टीला गेली. चार दिवस दोन्ही मुलं घरात बंद होते. यादरम्यान, ओल्गाने मुलांचा स्थितीबाबत कोणतीही माहिती घेतली नाही.

जेव्हा ती पार्टी करून घरी परत आली तेव्हा तिचा ११ महिन्यांचा मुलगा भूक आणि तहानने मरण पावला, तर तीन वर्षांची मुलगीही खूपच थकलेली आणि भयभीत होती. घरी जाताना ओल्गाने मुलांच्या आजीशी संपर्क साधला होता. मुलांची आजी जेव्हा घरी पोहचली तेव्हा तिने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ओल्गाला अटक केली, तर मुलीला रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा – करोना पॉझिटिव्ह सासऱ्याला पाठीवर घेऊन २ किमी अंतर पायी चालत सून पोहोचली रुग्णालयात; फोटो व्हायरल

रशियातील ज्लाटौस्ट zlatoust शहरात खटल्याच्या वेळी एका कोर्टाने ओल्गा बजरोवावर अल्पवयीन मुलाच्या हत्येसाठी अत्यंत क्रौर्य केल्याचा आरोप केला. तसेच आपल्या मुलीला अत्यंत धोकादायक परिस्थितीत सोडल्यामुळे आईचे कर्तव्य बजाविण्यात अपयशी ठरल्यामुळे दोषी ठरवले.

वृत्तानुसार पार्टीच्या चार दिवस आधी ओल्गाने आपल्या सात वर्षाच्या मुलाला मित्राच्या घरी सोडले होते. तिचा मोठा मुलगा तिच्या पहिल्या पतीचापासून झालेला आहे. तर दुसर्‍या पतीचापासून तीन वर्षाची मुलगी आणि ११ महिन्यांचा मुलगा होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mum murdered baby son starve drinking binge russia srk

ताज्या बातम्या