अज्ञात महिलेच्या नावाने विमान अपहरणाचा कट रचल्याचा बोगस ई-मेल मुंबई पोलिसांना पाठवणे एका तरुणाला भलतेच महागात पडले आहे. या तरुणाला हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. एम. व्ही. कृष्णा असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. चेन्नईतील प्रेयसीला मुंबई आणि गोव्यात फिरायला यायचे होते. तिने विमानाची तिकीटे काढण्यास वामसीला सांगितले होते. पण विमानाच्या तिकीटासाठी पैसे नसल्याने त्याने कृत्य केले, अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे.

मुंबई पोलिसांना शनिवारी रात्री एक ई-मेल मिळाला होता. तो हैदराबादमधील एका महिलेच्या नावाने पाठवण्यात आला होता. त्यात सहा व्यक्तींचे संभाषण आपण ऐकले असून, एकूण २३ जण येथून वेगवेगळ्या विमानांत बसणार आहेत. मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद या तीन शहरांतून ते विमानांचे अपहरण करणार आहेत, असा दावा ई-मेलमधून केला होता. या ई-मेलमुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. पोलिसांना सतर्क राहण्यासही सांगितले होते. विमान अपहरणाच्या कटाची अफवाही पसरवली जाऊ शकते, असा पोलिसांना अंदाज होता. पण चौकशी पूर्ण होईपर्यंत सुरक्षाविषयक काळजी घेणे आवश्यक आहे, असे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितले होते.

illegal quarry operator in panvel
पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

ई-मेलमधील मजकूर मुंबई पोलिसांनी सुरक्षा व गुप्तचर संस्थांना त्याच रात्री पाठवला होता. त्यानंतर विमानतळाशी संबंधितांची बैठक घेण्यात आली होती. रविवारी सकाळपासूनच तीनही विमानतळांवर घातपातविरोधी मोहिमा राबवण्यात आल्या होत्या. प्रवासी, त्यांचे सामान अशा अनेक गोष्टींची बारीक तपासणी करण्यात येत होती. सीआयएसएफने स्निफर डॉग्जही सेवेत आणले होते आणि सॅनिटेशन ड्रिससाठी कमांडो पथके तैनात केली होती. दुसरीकडे तो ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत होते. त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मुंबई पोलिसांनी हैदराबाद पोलिसांना दिली होती. हैदराबादमधील अमीरपेट परिसरातून पोलिसांनी कृष्णा याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता आपणच अज्ञात महिलेच्या नावाने बोगस ई-मेल मुंबई पोलिसांना पाठवल्याचे सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, चेन्नईतील आपल्या प्रेयसीला मुंबई आणि गोव्यात फिरायला जायचे होते. तिने त्याला विमानाची तिकीटे काढण्यास सांगितले होते.  मात्र, पैसे नसल्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे.