कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी सांगितले की, मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ केले जाईल .वारंवार सीमा वाद निर्माण होत असताना जुने नाव ठेवण्यात अर्थ नाही, त्यामुळे या भागाचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त असलेल्या ‘कर्नाटक राज्योत्सवा’दरम्यान बोम्मई यांनी ही घोषणा केली.

हैदराबाद-कर्नाटक क्षेत्राचे नाव आम्ही नुकतेच बदलून कल्याण कर्नाटक केले आहे. आता येत्या काही दिवसांत आम्ही मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. बेळगाव जिल्हा आणि कर्नाटकातील काही सीमावर्ती भाग महाराष्ट्रात विलीन करण्याच्या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी वारंवार केलेल्या दाव्यांवर मुख्यमंत्री बोलत होते. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही मुख्ममंत्री बोम्मई म्हणाले.

austrelian
भारतातील निवडणुकीचं वार्तांकन करण्याची परवानगी ऑस्ट्रेलिअन पत्रकाराला नाकारली? सरकारने स्पष्ट केली भूमिक
The Supreme Court asked the central government why it stopped the action against fraudulent advertisements
फसव्या जाहिरातींवरील कारवाई का रोखली? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
adhirranjan choudhari
दुसऱ्या टप्प्यात ध्रुवीकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी; १३ राज्यांत लोकसभेच्या ८९ जागांसाठी शुक्रवारी मतदान

आगामी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे बोम्मई यांनी सांगितले आहे. उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांच्या गटाला कित्तूर कर्नाटक प्रदेश असे नाव देण्यामागील कारण मुख्यमंत्री स्पष्ट यांनी केले आहे.

“कर्नाटकच्या एकीकरणानंतर, आमच्या सीमा विवादांना सुरुवात झाली आणि ते सोडवले गेले. पण तरीही आम्हाला भांडण सुरु असल्याचे ऐकायला येते. इतक्या गोष्टी घडत असताना त्याला मुंबई-कर्नाटक म्हणण्यात काही अर्थ आहे का? १९५६ मध्ये जेव्हा राज्य पुनर्रचना कायदा लागू झाला तेव्हा या क्षेत्रात बदल व्हायला हवा होता. केवळ नाव बदलून त्या प्रदेशातील लोकांचे जीवनमान आणि विकास सुधारत नाही, प्रादेशिक असमतोल आणि असमानताही दूर करून सर्व प्रदेशांचा एकत्रित विकास झाला पाहिजे. राज्यातील कोणतेही क्षेत्र अविकसित न ठेवण्याचा संकल्प करून प्रादेशिक विषमता संपवण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘कित्तूर कर्नाटक क्षेत्रा’च्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या कल्याण कर्नाटक प्रदेशासाठी पुढील अर्थसंकल्पात दुप्पट निधी दिला जाईल आणि त्यासाठी ३,००० कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असेही मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले.