Death threat to Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शनिवारी सायंकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दहा दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या अन्यथा माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्याप्रमाणे तुमचा शेवट करू, अशा धमकीचा संदेश मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता. या घटनेची बातमी पसरताच एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्नांनी काही तासातच ही धमकी देणार्‍या संशयित तरुणीला ताब्यात घेतले आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून २४ वर्षीय फातिमा खान नावाच्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर तरुणी माहिती तंत्रज्ञान शाखेतून पदवीधर झालेली आहे. तिची मानसिक स्थिती बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला शनिवारी सायंकाळी धमकीचा संदेश प्राप्त झाला होता. एका अनोळखी क्रमांकावरून धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता. दहा दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न दिल्यास बाबा सिद्दिकी यांच्याप्रमाणेच परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीत म्हटले होते. बाबा सिद्दिकी यांच्यावर १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे पूर्व येथे गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यानंतर बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान यालाही अशाच प्रकारची धमकी मिळाली होती.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Iranian university hijab protest
Iran Hijab Protest: हिजाब सक्तीच्या विरोधात विद्यार्थीनीचं निर्वस्त्र होत आंदोलन; व्हिडीओ व्हायरल होताच विद्यापीठानं केली कारवाई
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Man Assaults Woman In Greater Noida
VIDEO : केस पकडले, कानशीलात लगावल्या; तरुणाची भररस्त्यात मैत्रिणीला मारहाण
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, फातिमा खान ही उच्चशिक्षित तरुणी आहे. मात्र तिची मानसिक स्थिती ठीक नाही. मुंबईच्य दहशतवादी विरोधी पथक आणि उल्हासनगर पोलिसांनी एकत्रितपणे केलेल्या कारवाईत संशयित तरुणीला ताब्यात घेण्यात आले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात प्रचाराला येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ही धमकी आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला तिसऱ्यांदा अशाप्रकारे धमकीचा संदेश मिळाला आहे. २९ ऑक्टोबर रोजी सलमान खानकडे दोन कोटींची खंडणी मागणारा संदेश प्राप्त झाला होता. त्यानंतर पाच कोटींची खंडणी मागणाराही संदेश प्राप्त झाला होता.

Story img Loader