scorecardresearch

केरळमध्ये संघ स्वयंसेवकाची हत्या

केरळमधील पालक्काड येथे एका टोळीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाची शनिवारी दुपारी तीक्ष्ण शस्त्राने हत्या केली.

crime
(फाईल फोटो)

पीटीआय, पालक्काड : केरळमधील पालक्काड येथे एका टोळीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाची शनिवारी दुपारी तीक्ष्ण शस्त्राने हत्या केली. श्रीनिवासन (४५) नावाचा हा कार्यकर्ता पालक्काड शहराच्या मध्यभागी असलेल्या त्याच्या दुकानात असताना एका गटाने त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोर मोटारसायकलींवरून तेथे आले होते. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या श्रीनिवासन याला लगेच एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचवता येऊ शकला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

येथून जवळच असलेल्या एका खेडय़ात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या एका कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्यानंतर २४ तासांच्या आत ही घटना घडली आहे. सुबैर (४३) नावाचा हा कार्यकर्ता शुक्रवारी दुपारी मशिदीत प्रार्थना करून परतत असताना एलाप्पुल्ली येथे त्याला भोसकून ठार मारण्यात आले होते. पीएफआयची राजकीय शाखा असलेली सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) श्रीनिवासनच्या हत्येमागे असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder sangh swayamsevak kerala rashtriya swayamsevak sangh weapons murder ysh

ताज्या बातम्या