धर्मांतर प्रकरणी मीरत येथील धर्मगुरूस मौलाना कलीम सिद्दिकी याला दहशतवादविरोधी पथकाने मंगळवारी रात्री मीरत येथून अटक केली, अशी माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी दिली.

धर्मगुरूस अटक केल्यानंतर त्याला दहशतवादविरोधी पथकाच्या मुख्यालयात आणण्यात आले. त्याआधी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. दिल्लीतील जामियानगर येथील रहिवासी असलेल्या मुफ्ती काझी जहांगीर आलम कासमी व महंमद उमर गौतम या मुस्लीम दवा केंद्र चालवणाऱ्या दोघांना याआधी अटक करण्यात आली होती. ते ‘आयएसआय’च्या सूचनेनुसार मुक्या बहिऱ्या लोकांचे धर्मांतर करण्याचे काम करीत होते.

२० जूनला दहशतवादविरोधी पथकाने धर्मांतर करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश केला होता.  सिद्दिकीसह आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. सिद्दिकी हा बेकायदा धर्मांतर टोळीत सामील होता.