उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एका मुस्लीम व्यक्तीने महिलेला हिंदू असल्याचे सांगत तिला फसवून तिच्याशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढच नाही तर लग्नानंतर त्याने इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी महिलेवर दबाव आणल्याचंदेखील पुढे आलं आहे. चांद मोहम्मद असं या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान, वन स्टॉप सेंटर या संस्थेकडून महिलेची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी महिलेने लखनऊ पोलिसांकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती आहे.
हेही वाचा – पत्नीची हत्या करून शव घरातच पुरलं; १८ महिन्यांनंतर पतीला अटक
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, लखनऊ येथे राहणाऱ्या चांद मोहम्मद याने एका महिलेला हिंदू असल्याचे सांगत तिच्याची विवाह केला. यावेळी त्याने आपले नाव सनी मोर्या असल्याचे तिला सांगितलं. विवाहानंतर दोघेही लखनऊमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होते. मात्र, लग्नाच्या काही दिवसानंतर महिलेला आपला पती मुस्लीम असल्याचं समजलं. यावेळी तिने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, चांद मोहम्मदने तिला मारहाण करत एका खोलीत बंद करून ठेवले.
हेही वाचा – चहा पाजून केले १२० बलात्कार; व्हिडिओही रेकॉर्ड केले, नराधम जलेबी बाबाला १४ वर्षांची शिक्षा
यादरम्यान चांद मोहम्मदने अनेकदा मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. मात्र, तिने धर्मांतर करण्यास विरोध केल्यानंतर चांद मोहम्मदने तिला सिगारेटचे चटके दिले. तसेच तिच्या अंगावर गरम तेल ओतले. एवढच नाही तर ती पाच महिन्याची गर्भवती असताना तिच्या पोटावर लाथ मारली, त्यामुळे तिला गर्भपात करावा लागला. तसेच याबाबत घरच्यांना सांगितलं तर जिवे मारेन, अशी धमकीही त्याने महिलेला दिली. दरम्यान, लखनऊमधील वन स्टॉप सेंटर या संस्थेने चांद मोहम्मदच्या तावडीतून महिलेची सुटका केली असून महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली असल्याची माहिती आहे.