अनाथ हिंदू मुलीचं पालन करणाऱ्या मुस्लीमानं वैदिक पद्धतीनं हिंदू तरुणाशी लावलं लग्न

कर्नाटकातील विजयपुरा येथे एक अनोखे प्रकरण उघडकीस आले आहे

Muslim Man Who Looked After Orphaned Hindu Girl Marries Her Off to Hindu Boy As Per Vedic Traditions
एका मुस्लीम पित्याने त्याच्या मुलीचं वैदिक पद्धतीनं हिंदू तरुणाशी लग्न लावलं (photo ani)

कर्नाटकातील विजयपुरा येथे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. एका मुस्लीम पित्याने त्याच्या मुलीचं वैदिक पद्धतीनं हिंदू तरुणाशी लग्न लावलं. मुस्लीम पित्याने एका अनाथ हिंदू मुलीचे संगोपन केले होते. मेहबूब मस्ली हे १८ वर्षीय हिंदू मुलगी पूजा वडिगेरीचे पालक आहेत. पूजाचे नुकतेच लग्न झाले आहे. मेहबूब मस्ली यांनी शुक्रवारी विधीनुसार पूजाचे एका हिंदू तरुणाशी लग्न लावले.

पूजा अनाथ होती आणि तिच्या नातेवाईकांनी तिचे संगोपन करण्यास नकार दिल्यानंतर मस्लीने वडिलांच्या रूपात तिची काळजी घेतली. मस्ली दोन मुली आणि दोन मुलांचा बाप असला तरी त्याने पूजाला घरी आणण्याचा निर्णय घेतला. “ती ज्या धर्माची आहे त्या व्यक्तीशी तिचे लग्न करण्याची माझी जबाबदारी होती,” असे मेहबूब मस्ली सांगतात.

मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्यास भाग पाडले नाही

“ती माझ्या घरामध्ये अधिक काळ राहिली पण मी तिला कधीच आमचा धर्म (इस्लाम) पाळण्यास किंवा मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्यास भाग पाडले नाही. हे आपल्या धर्माच्या सिद्धांतांच्या विरुद्ध आहे”, असे मेहबूब मस्ली यांनी एएनआयला सांगितले. तसेच वराच्या पालकांनी हुंडा न मागता आनंदाने पूजाला स्वीकारल्याचे मस्ली म्हणाले. त्यांनी लोकांना विविध समुदायांमध्ये सामंजस्याने राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा- पैसे नसल्याने अपूर्ण राहिलेली शेवटी इच्छा ते ‘भारतरत्न’साठी शिफारस… जाणून तिंरग्याचे रचनाकार पिंगली वेंकैयांबद्दलच्या १० खास गोष्टी

गणपती कार्यक्रमांचे आयोजन देखील करतात 

ते म्हणाले, “मला समाजाला एक संदेशही द्यायचा आहे की प्रत्येकाने सामंजस्याने जगावे”. मस्ली शहरात अनेक सामाजिक सेवा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी ओळखले जाते. शहरात गणपतीचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठीही ते ओळखले जातात. यावर पुजा म्हणाली, “मी खूप धन्या आहे की अशा महान पालकांनी मोठ्या मनाने माझी काळजी घेतली.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Muslim man who looked after orphaned hindu girl marries her off to hindu boy as per vedic traditions srk

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या