मुस्लिम विवाह हिंदू विवाहाप्रमाणे संस्कार नसून करार आहे: हायकोर्ट

मुस्लिम विवाह हा एक करार असून त्याच्या अनेक छटा आहेत. त्यात हिंदू विवाहासारखे संस्कार नाहीत, असं न्यायलयाने म्हटलंय.

Marriage
(प्रातिनिधीक छायाचित्र)

मुस्लिम विवाह हा करार असून त्याला विविध छटा आहे. तो हिंदू विवाहासारखा संस्कार नाही. मुस्लिम विवाह घटस्फोटानंतर उद्भवणारे काही अधिकार आणि कर्तव्ये पूर्ण करत नाहीत. बेंगळुरूच्या भुवनेश्वरी नगरमध्ये एजाजूर रहमान (५२) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.

रेहमानने लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच ५ हजार रुपये मेहर देऊन आपली पत्नी सायरा बानूला ५ नोव्हेंबर १९९१ रोजी तीन तलाक दिला होता. घटस्फोटानंतर रेहमानने दुसरे लग्न केले आणि त्यांना एक मुलगा आहे. दरम्यान, २००२मध्ये पहिली पत्नी सायरा बानूने पोटगीच्या रकमेसाठी दिवाणी दावा दाखल केला. यावर कौटुंबिक न्यायालयाने आदेश दिला की, सायरा बानूला खटल्याच्या तारखेपासून तिचा मृत्यू होईपर्यंत किंवा तिचा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा पतीच्या मृत्यूपर्यंत महिन्याला खर्चासाठी ३ हजार रुपये देण्यात यावे.

दरम्यान, २०११ मध्ये पुन्हा सायरा बानूने न्यायालयात याचिका दाखल करत खर्चासाठी महिन्याला २५ हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी केली होती. ही सायरा बानूची याचिका फेटाळून न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित यांनी ७ ऑक्टोबरला दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, “मुस्लिम विवाह हा एक करार असून त्याच्या अनेक छटा आहेत. हे हिंदू विवाहासारखे संस्कार नाहीत. मुस्लिम विवाह घटस्फोटानंतर उद्भवणारे काही अधिकार आणि कर्तव्ये पूर्ण करत नाहीत. असे लग्न घटस्फोटामुळे संपते. मुस्लिमांमधील विवाह हा करारापासून सुरू होतो. मग तो विवाह सुशिक्षित पदवीधर व्यक्तींचा असो अथवा सामान्य नागरिकांचा असो,” असेही न्यायाधीश म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Muslim marriage is a contract and not sacrament unlike a hindu marriage hrc

ताज्या बातम्या