नाशिकमध्ये अफगाणिस्तानच्या ३५ वर्षीय धर्मगुरुंची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ख्वाजा सय्यद चिश्ती असं या धर्मगुरुंचं नाव असून ‘सुफी बाबा’ नावाने त्यांना ओळखलं जात होतं. डोक्यात गोळी झाडण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या केल्यानंतर हल्लेखोर कारमधून पळून गेले. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Rajendra Pawar vs Ajit Pawar
“..आणि तेव्हापासून पवार कुटुंबीयात दुरावा निर्माण झाला”, बारामतीमध्ये निनावी पत्र व्हायरल; राजेंद्र पवार म्हणाले…
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?

या हत्येमध्ये चालक प्रमुख संशयित असल्याचं पोलीस अधिक्षक (नाशिक ग्रामीण) सचिन पाटील यांनी सांगितलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद चिश्ती अनेक वर्ष नाशिकमधील येवलामध्ये वास्तव्यास होते. या हत्येमागे कोणतंही धार्मिक कारण असल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे. संपत्ती किंवा पैशांच्या वादातून हत्या झाल्याचं निष्पन्न होत आहे. मात्र पोलीस इतर सर्व बाजूंची पडताळणी करत आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.

नेमकं काय झालं?

“आरोपी आणि पीडित गाडीतून आले होते. येवल्यात दोन तीन ठिकाणी पूजा केल्यानंतर त्यांनी जेवण केलं. यानंतर एमआयडीसीत एके ठिकाणी जमीन खरेदी करायची असल्याने पूजा करायचं असल्याचं सांगत चालक आणि इतर आरोपी सय्यद चिश्ती यांना तिथे घेऊन गेले. यानंतर गाडीत बसत असताना आरोपींनी गोळी घालून त्यांची हत्या केली आणि फरार झाले,” अशी माहिती सचिन पाटील यांनी दिली आहे.

यामध्ये तीन मुख्य आरोपी असून एकाची चौकशी केली जात आहे. चालक सध्या फरार आहे अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही असंही सचिन पाटील यांनी सांगितलं आहे.