‘या’ कारणासाठी मुस्लिम महिलेने हिंदू धर्मात केला प्रवेश

एका २४ वर्षीय मुस्लिम महिलेने धर्मांतर केले. अर्शी खान असे या महिलेचे नाव असून तिने मुस्लिम धर्माचा त्याग करुन हिंदू धर्मात प्रवेश केला.

सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया

उत्तर प्रदेशात मथुरेमध्ये एका २४ वर्षीय मुस्लिम महिलेने धर्मांतर केले. अर्शी खान असे या महिलेचे नाव असून तिने मुस्लिम धर्माचा त्याग करुन हिंदू धर्मात प्रवेश केला. इस्लाममध्ये महिलांचा अजिबात आदर केला जात नाही असे अर्शी खानने धर्मांतर केल्यानंतर सांगितले. धर्मांतर केल्यानंतर अर्शी खानने लगेच एसएसपीचे कार्यालय गाठून अर्ज सादर केला.

त्यात तिने आपण कोणाच्याही दबावाखाली हा निर्णय घेतलेला नाही. कृष्णाप्रती भक्ती आणि हिंदू धर्मावर विश्वास असल्याने स्वेच्छेने आपण हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. इस्लाममध्ये महिलांचा अजिबात आदर केला जात नाही हे धर्म सोडण्यामागचे एक मुख्य कारण असल्याचे तिने सांगितले.

हिंदू दुर्गा, लक्ष्मी आणि सीता मातेची पूजा करतात. पण इस्लाममध्ये महिलांना स्थान नाही असे तिने सांगितले. धर्मानंतर केल्यानंतर तिने अर्शी हे नाव बदलून आरुशी हे नाव धारण केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Muslim woman converts hinduism