अमेरिकेत मुस्लीम महिलेस पेटवण्याचा प्रयत्न

एका अज्ञात व्यक्तीने लायटरच्या मदतीने तिला पेटवून दिले.

अमेरिकेत ९/११ दहशतवादी हल्ल्याच्या १५ व्या स्मृतिदिनाच्या अगोदर एका महिलेला पेटवण्यात आले. ३६ वर्षांच्या या मुस्लीम महिलेने इस्लामी पेहराव केला होता. तिच्यावर येथे हल्ला करण्यात आला. या महिलेची ओळख पटलेली नसून ती शहरातील मोठे उत्पादन विक्री केंद्र असलेल्या फिफ्थ अ‍ॅव्हेन्यू इमारतीत गेली असता शनिवारी रात्री ही घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने लायटरच्या मदतीने तिला पेटवून दिले.

नागरी हक्क गटाच्या न्यूयॉर्क येथील विभागाने अमेरिकी-इस्लामी संबंध मंडळाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध केला आहे. मुस्लिमांवर राज्यात हल्ले होत असून देशातही गेल्या काही महिन्यात हल्ले झाले आहेत असे सांगण्यात आले. द्वेषमूलक भावनेतून केल्या जाणाऱ्या गुन्ह्य़ांच्या संदर्भात तपासासाठी न्यूयॉर्कच्या महापौरांनी पैसा खर्च करावा असे सांगण्यात आले.

या महिलेच्या हाताला  चटका बसला. तिने संशयिताने लायटर पेटवलेला पाहिले व नंतर तो निघून जात होता असे न्यूयॉर्क डेली न्यूजने म्हटले आहे. या महिलेने नंतर तिच्या ब्लाउजच्या बाह्य़ांना लावलेली आग विझवली, ती या हल्ल्यातून बचावली आहे.

हल्ला होत असताना तिने काही प्रतिक्रिया दिली नाही.

एनवायपीडी हेट क्राइम टास्क फोर्स या संस्थेने या हल्ल्यामागचा हेतू शोधण्याचे ठरवले आहे. मुस्लीम व इस्लामी संस्थांवर न्यूयॉर्कमध्ये हल्ले वाढले असून ती सर्व अमेरिकी लोकांसाठी चिंतेची बाब आहे, असे केअर-एनवाय संस्थेचे कार्यकारी संचालक अफाफ नाशर यांनी सांगितले.

गेल्या आठवडय़ात दोन मुस्लीम महिलांवर त्या मुलांना स्ट्रोलमध्ये घेऊन जात असताना हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांनी त्यांचे बुरखे फाडण्याचा प्रयत्न केला.

याच महिन्यात साठ वर्षे वयाच्या नझमा खानम या महिलेला भोसकण्यात आले होते. मुस्लीम विरोधी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहेत असे केअर या संस्थेने म्हटले आहे. इस्लामोफोबियाच्या घटना तेथे वाढल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Muslim woman fired by man in us

ताज्या बातम्या