scorecardresearch

मुलीवर सामूहिक बलात्कार करून दृश्यफीत समाजमाध्यमांवर टाकली

हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी मुलीला दिली आहे.

चार आरोपी अद्याप फरार

एका सतरा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून चार युवकांनी त्याचे चित्रीकरण केले असल्याची घटना समोर आली असून त्यात ही दृश्यफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. नवी मंडी भागात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. नवी मंडी पोलीस ठाण्याचे अधिकारी राजनाथ त्यागी यांनी सांगितले की, ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून त्याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार सिद्धार्थ अंकित, माँटी, अतुलकुमार यांनी मुलीला पळवून एका फ्लॅटमध्ये नेले व तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, त्याचे चित्रीकरण करून व्हिडीओ फीतही तयार केली. त्यांनी हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी मुलीला दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून , चारही आरोपी अद्याप फरार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Muzaffarnagar four youth rape girl circulate video on social media