म्यानमारच्या एका न्यायालयाने देशाच्या निर्वासित नेत्या आंग सान स्यू की यांना आणखी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. करोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीरपणे वॉकी-टॉकी आयात केल्याबद्दल आणि त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी ६ डिसेंबर रोजी सू की यांना करोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि लोकांना भडकावण्याच्या इतर दोन आरोपांसाठी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा नंतर दोन वर्षांपर्यंत कमी करण्यात आली आणि त्यांना नेपीडाव शहरात नजरकैदेत राहण्याची परवानगी देण्यात आली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय समुदायाने हा संपूर्ण खटला खोटा असल्याचं म्हणत जोरदार टीका केली होती आणि स्यू की यांची त्वरित सुटका करण्याची मागणी केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Myanmars aung san suu kyi jailed for 4 years for walkie talkie possession hrc
First published on: 10-01-2022 at 14:27 IST