अमेरिकेसमवेत कोणत्याही चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आण्विक सत्ता म्हणून मान्यता देण्याची पूर्वअट उत्तर कोरियाने घातली आहे.
तथापि, कोणत्याही चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी उत्तर कोरियाने आपल्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमापासून दूर राहावे, ही अमेरिकेची मागणी उत्तर कोरियाने सपशेल फेटाळल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. कोणतीही चर्चा ही आण्विकसज्ज देशांसमवेतच झाली पाहिजे, असेही वृत्तपत्रात म्हटले आहे.
उत्तर कोरियाची मागणी कधीही मान्य करता येणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. उत्तर कोरियाने फेब्रुवारी महिन्यात अणुसत्ता म्हणून तिसरी आण्विक चाचणी केली.
कोरियाच्या द्वीपकल्पात जवळपास महिनाभर तणाव होता. त्यानंतर अमेरिका, सेऊल आणि पायोंगयाँग चर्चेची शक्यता तपासून पाहत आहेत. मात्र आतापर्यंत एकमेकांच्या पूर्वअटी फेटाळण्यातच ऊर्जा खर्च होत आहे.