NABARD Recruitment 2026 apply online: राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत (नाबार्ड) विविध पदांसाठी भरती सुरू आहे. यामध्ये ‘विकास सहायक गट ब’ आणि ‘विकास सहायक (हिंदी) गट ब’ या पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणारा उमेदवार अर्ज करु शकतो. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. १७ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
‘नाबार्ड’ने जाहीर केलेल्या या भरतीतून एकूण १६२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीतून ‘विकास सहाय्यक गट ब’ च्या १५९ जागा तर ‘विकास सहाय्यक (हिंदी) गट ब’ च्या ३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या भरतीमध्ये सर्वाधिक रिक्त जागा महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र राज्यासाठी विकास सहाय्यकाच्या ४८ आणि विकास सहाय्यक (हिंदी) गट ब ची एक रिक्त जागा आहे. त्यामुळे १६२ रिक्त जागांपैकी सर्वाधिक ४९ रिक्त जागा महाराष्ट्रासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
नाबार्ड भरतीमध्ये सर्वाधिक रिक्त जागा असणाऱ्या राज्यांची यादी खालीलप्रमाणे
१. महाराष्ट्र – ४९
२. उत्तर प्रदेश -११
३. मध्ये प्रदेश – १०
४. तामिळनाडू – १०
५. गुजरात – ९
६. आंध्र प्रदेश – ८
७. पश्चिम बंगाल – ८
८. ओडिशा – ८
९. कर्नाटक – ७
१०. आसाम – ५
११. छत्तीसगड – ५
१२. राजस्थान – ५
नाबार्ड भरतीबद्दल महत्त्वाची माहिती
पदाचे नाव- विकास सहाय्यक गट ब, विकास सहाय्यक (हिंदी) गट ब
एकूण रिक्त जागा – १६२
अधिकृत वेबसाईट – https://www.nabard.org/
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
अर्ज प्रक्रिया सुरू – १७ जानेवारी २०२६
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस -०३ फेब्रुवारी २०२६
नोकरीची ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा पद्धत कशी असणार?
नाबार्ड भरती २०२६ मधून विकास सहाय्यक गट ब आणि विकास सहाय्यक (हिंदी) गट ‘ब’ या दोन पदांच्या एकूण १६२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये दोन टप्पे असणार आहेत. सुरुवातीचा टप्पा म्हणजे पूर्व परीक्षा जी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. तर दुसरा टप्पा मुख्य परीक्षेचा असणार आहे. मुख्य परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. या दोन्ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेत देता येणार आहेत. यातील पूर्व परीक्षेचा टप्पा फक्त पात्रतेसाठीचा असणार आहे. तर उमेदवारांची अंतिम निवड ही त्यांच्या मुख्य परीक्षेतील गुणांवरून होणार आहे.
वय मर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि वेतन
नाबार्ड भरतीसाठी २१ ते ३५ वर्ष वय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तर काही प्रवर्गांना वयात सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसुचित जाती आणि जमातींना ५ वर्ष, इतर मागासवर्गीयांना ३ वर्ष सूट देण्यात आलीआहे.
विकास सहाय्यक गट ब या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. तर विकास सहाय्यक (हिंदी) गट ब या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजी/हिंदी माध्यमात पदवी, ज्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी हे अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय म्हणून समाविष्ट असावेत आणि किमान ५०% गुण (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/दिव्यांग/माजी सैनिक उमेदवारांसाठी उत्तीर्ण गुण) मिळवलेले असावेत. उमेदवाराला इंग्रजीमधून हिंदीमध्ये आणि याउलट भाषांतर करता आले पाहिजे.
या भरतीमध्ये निवड झाल्यास उमेदवारांना सुरुवातीला नोकरीदरम्यान प्रतिमाह ४६५०० रुपये (२३१०० मुळ पगार) पगार मिळणार आहे.
