बलात्काराच्या आरोपावरून फरार असलेला व स्वयंघोषित गुरू आसाराम बापू यांचा पुत्र नारायण साई युवतीसांठी सांकेतिक शब्दांचा वापर करत असल्याचा खुलासा एका सेविकेने केला आहे.
नारायण साईचा विरारमधील आश्रम जमीनदोस्त
सेविका गंगाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, साईच्या आश्रमामध्ये युवतींबरोबर सांकेतिक शब्दांचा वापर केला जात असे. यामध्ये ‘तिलक लगा लिया है’, ‘तिलक मिटा ना पाए’, ‘चंदन का तिलक लगा लिया है’, ‘भगवान का भोग तयार हो गया है’ या सांकेतिक शब्दांचा वापर केला जात असल्याचेही गंगाने सांगितले आहे.
नारायण साईकडून निर्दोष असल्याच्या जाहिराती
गंगा व जमुना या नारायण साई व आसाराम बापू यांच्या विश्वासू सेविका असल्याचेही माहिती समोर आली आहे. तसेच नारायण साईंपासून जमुनाला एक मुलगा झाला आहे व या दोघींना आश्रमात मोठा दर्जा होता. या दोघींच्या नावावर काही संपत्तीही केली असल्याची माहिती समोर येत आहे.
गर्भपातासाठी आसाराम बापूंचा पीडित महिलांवर दबाव
नारायण साईचा पोलिसांना चकमा..

Story img Loader