“नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार”; भाजपा नेत्याचं वक्तव्य

“नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा ते नवयुगाचे निर्माते आहेत; असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो”

Narendra Bhai Modi, Narendra Modi, Almighty, Uttar Pradesh Minister Upendra Tiwari,
"नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा ते नवयुगाचे निर्माते आहेत; असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो" (File Photo: PTI)

उत्तर प्रदेशातील भाजपा मंत्री उपेंद्र तिवारी यांचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाचा अवतार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हरदोई येथील एका सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. “नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत,” असं ते म्हणाले आहेत.

चारचाकीवाल्यांनाच पेट्रोल लागतं, ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही; योगींच्या मंत्रीमंडळामधील मंत्र्याचं तर्क

“नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा ते नवयुगाचे निर्माते आहेत. असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत. एका प्रधानसेवकाच्या रुपात आपल्यामध्ये काम करण्यासाठी ते आले आहेत,” असं उपेंद्र तिवारी यांनी म्हटलं आहे.

९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही

नुकतंच उत्तर प्रदेशातील ‘या’ भाजपा नेत्याने वाढत्या इंधनदारावर बोलताना देशातील ९५ टक्के लोकांना पेट्रोलची गरज नाही असं आश्चर्यकारक विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन जोरदार टीकादेखील करण्यात आली होती. “भारतामध्ये चारचाकी गाड्या चालवणाऱ्या मोजक्या लोकांना पेट्रोलची गरज असते. ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही,” असं वक्तव्य उपेंद्र तिवारी यांनी केलं.

“सरकारने करोनाच्या लसी आणि करोनावरील उपचार मोफत पुरवले आहेत. इंधनाचे दर वाढलेले नाहीत. तुम्ही जर दरडोई उत्पन्न आणि इंधनाच्या दरांमध्ये झालेली वाढ याची तुलना केली तर इंधनाचे दर फार कमी आहेत,” असा युक्तीवाद तिवारी यांनी केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Narendra bhai modi is an incarnation of the almighty says uttar pradesh minister upendra tiwari sgy

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या