जगभरात दहशतवादाचा भस्मासूर वाढत चालला असल्याने त्याविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले. ब्रसेल्समध्ये झालेल्या स्फोटात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहून मोदी यांनी आपल्या भाषणांत वरील आवाहन केले. या वेळी बेल्जियमचे पंतप्रधान चार्लस मायकेल आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. भारताने बंदरांचा मोठय़ा प्रमाणावर विकास करण्याचा निर्णय घेतला असून बेल्जियमला व्यापारासाठी बंदरे उपलब्ध करून दिली जातील, असे मोदी म्हणाले. या वेळी त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञान, हिरे व्यापार, बेल्जियमशी असलेले रक्ताचे नाते अशा विविध मुद्दय़ांना स्पर्श केला.