पीटीआय, वाराणसी

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या वाराणसी मतदारसंघाला मंगळवारी प्रथमच भेट दिली. यावेळी गंगा मातेने मला दत्तक घेतल्याची आपली भावना असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

A letter from the people of Nagpur on the occasion of Devendra Fadnavis birthday nagpur
“उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपण नागपूरकरांना वाळीतच टाकले…” देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या ‘त्या’ पत्राची सर्वत्र चर्चा
Donald Trump in first speech after assassination attempt I had God on my side
“देव माझ्या बाजूने…” गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग
Akola, Harish Pimple, BJP MLA, Arjun Lotane, social media, Prime Minister Modi, verbal spat, threats, police complaint, Murtijapur, controversy, corruption, akola news, latest news, loksatta news,
मोदींवर टीका करताच भाजप आमदार भडकले….वारकऱ्याला थेट मारण्याची धमकी दिल्याचा…
union home minister amit shah likely to kolhapur for inauguration with condition
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा बँकेची अशी ही ‘झाडा’झडती; उद्घाटनासाठी येण्याकरीता १० हजार झाडे लावण्याची सक्ती
my statement was not for cm eknath shinde says Ganesh Naik
माझा रोख मुख्यमंत्र्यांकडे नाही- गणेश नाईक
Ganesh Naik challenged the Chief Minister through CIDCO and Urban Development Department
अस्वस्थ गणेश नाईक यांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान
Narendra Modi 'Hindu Card' Comment Video
नरेंद्र मोदींनी ‘हिंदुत्वाचे कार्ड’ राजकारणात खेळल्याची कबुली दिली? Video मध्ये म्हणाले, “हा निवडणुकीचा अजेंडा नाही तर.. “
Loksatta editorial High Court granted bail to former Jharkhand Chief Minister Hemant Sorenm
अग्रलेख: नियम आणि नियत!

वाराणसीच्या जनतेने मला केवळ खासदार म्हणून नव्हे, तर तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची संधी दिल्याची कृतज्ञता मोदी यांनी व्यक्त केली. यंदाच्या निवडणुकीत एक लाख ५२ हजारच्या मताधिक्याने पंतप्रधान वाराणसीतून विजयी झाले. २०१९ मध्ये चार लाख ८० हजार मतांनी ते विजयी झाले होते. जनतेने जो कौल दिला तो ऐतिहासिक आहे. नव्या सरकारने आपला पहिला निर्णय शेतकरी व गरिबांसाठी घेतल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आदी उपस्थित होते. शेतकरी, महिला, युवक व गरीब हे विकसित भारताचे भक्कम खांब आहेत. भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने कृषी क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले. गरिबांसाठी तीन कोटींहून अधिक घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. संध्याकाळी काशी येथील दशाश्ववेधघाटावर पंतप्रधानांच्या हस्ते गंगा आरती करण्यात आली.

वाराणसीचे खासदार आणि पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक केल्यानंतर पंतप्रधानांनी प्रथमच आपल्या मतदारसंघाला भेट दिली. यावेळी त्यांनी वाराणसीच्या जनतेचे आभार मानले.

लोकांच्या विश्वासातून कामाची प्रेरणा

जनतेने लोकसभा निवडणुकीत जो विश्वास टाकला त्यातून प्रचंड आत्मविश्वास मिळाला आहे. यातूनच सतत कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळते. अधिक जोमाने काम करून जनतेची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी या वेळी सांगितले.

९.२६ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम हस्तांतरीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरातील ९.२६ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याअंतर्गत २० हजार कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित केली. वाराणसीमध्ये पीएम किसान सन्मान संमेलनादरम्यान मोदींनी ही रक्कम हस्तांतरीत केली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा लोकसभा मतदारसंघाचा हा पहिला दौरा होता. पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मोदींनी किसान सन्मान निधीची रक्कम वितरीत करण्याचा पहिला निर्णय घेतला होता. वाराणसी येथील कार्यक्रमाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान , उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक उपस्थित होते.

लोकशाही राष्ट्रांमध्ये सलग तिसऱ्यांदा जनतेचा कौल मिळणे हे दुर्मीळ असते. मात्र भारताच्या जनतेने ते करून दाखवले आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान