भारतात या!; डोनाल्ड ट्रम्प कुटुंबियांना नरेंद्र मोदींचे निमंत्रण

इवांकाने निमंत्रण स्वीकारले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले.

अमेरिका दौऱ्यात व्हाईट हाऊसमध्ये खास स्वागत करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात येण्याचे अगत्याचे निमंत्रण दिले. ट्रम्प यांची मुलगी इवांका हिने मोदींचे निमंत्रण स्वीकारले असून, लवकरच ट्रम्प हे कुटुंबियांसह भारतात येण्याची शक्यता आहे.

ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना पहिल्यांदाच भेटले. मोदी आणि ट्रम्प यांच्यातील बहुचर्चित भेट अखेर झाली. ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले. दोन्ही देशांच्या नेत्यांच्या बैठकीकडे आणि त्यात होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. पहिल्या भेटीनंतर नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचे निमंत्रण दिले. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी सहकुटुंब भारतात यावे. तुमच्या स्वागतासाठी मी उत्सुक आहे, असं मोदींनी म्हटलं आहे. ट्रम्प यांची मुलगी इवांका हिने मोदींचे आमंत्रण स्वीकारले. त्यानंतर मोदींनी ट्विटद्वारे त्यांचे आभार मानले. इवांकानेही मोदींचे आभार मानले. भारतात होणाऱ्या जागतिक उद्योजकता संमेलनात अमेरिकी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने उपस्थित राहावं, यासाठी निमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानते, असं ट्विट इवांकाने केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Narendra modi in us prime minister narendra modi invites president donald trump and family to india