विरोधकांवर टीका करण्यासाठी नरेंद मोदी खोटे बोलत असल्याचा आरोप पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला.मध्य प्रदेशमधील प्रचारसभेत पंतप्रधानांनी भाजपवर चौफेर टीका केली.
लोकशाहीमध्ये सकारात्मक टीका करता येते. भाजप नेते मात्र उत्साहाच्या भरात स्वत:च्या फायद्यासाठी लोकांना चुकीच्या गोष्टी सांगत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भाजपने नकारात्मक राजकारण सुरू केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. कोणतेही काम न करणाऱ्या मध्य प्रदेशातील शिवराज सिंह सरकारला पराभूत करा, असे आवाहन त्यांनी केले. गुजरातच्या विकासाबद्दल भाजप दावे करते, मात्र त्यातील पोकळपणा उघड झाला आहे. भाजपने आपली विचारसरणी बदलावी, असा सल्लाही पंतप्रधानांनी दिला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती हे भाजपने विसरू नये याची आठवणही पंतप्रधानांनी करून दिली.