Narendra Modi on Women Security : ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांविरोधात सुरू असलेल्या अत्याचारांवर भाष्य केलं. अशी कृत्ये करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे, असं मोदी म्हणाले.

याबाबत मोदी म्हणाले, “आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत. महिला नेतृत्वही करत आहेत. संरक्षण क्षेत्रातही महिलांची ताकद दिसत आहे. पण दुसरीकडे काही चिंताजनक गोष्टीही समोर येतात. मी आज पुन्हा एकदा यावर वेदना व्यक्त करत आहे. समाज म्हणून आपल्याला विचार करावा लागेल. आपल्या माता-बहि‍णींवर होणाऱ्या अत्याचारांबाबत देशाचा आक्रोश आहे.

pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
gujrat bjp corporator allegation of misbehave
Gujarat : भाजपाच्या नगरसेविकाचा पक्षातील नेत्यावरच गंभीर आरोप; म्हणाल्या, “त्यांनी माझा हात पकडला अन् व्यासपीठावरून…”
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
sanjay raut criticized devendra fadnavis
Sanjay Raut : “हा महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार”; राजकोट किल्ल्यावरील राड्यावरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “भाजपाच्या गुंडांनी काल…”

“नागरिकांचा आक्रोश आहे. तो मी समजू शकतो. आपल्या देशाला, समाजाला, आपल्या राज्य सरकारांना या गोष्टी गांभीर्याने घ्याव्या लागतील. महिलांविरोधातील गुन्ह्यांचा लवकरात लवकर तपास व्हावा आणि अमानुष कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी हा विश्वास निर्माण व्हायला हवा. बलात्काराची घटना घडते तेव्हा त्याची खूप चर्चा होते. माध्यमांमध्ये येतं. पण जेव्हा अशा लोकांना शिक्षा होते, तेव्हा त्याची तेवढी चर्चा होत नाही. मला वाटतं ती मोठ्या प्रमाणावर व्हायला हवी. तेव्हा कुठे अशी कृत्य करणाऱ्यांना जरब बसेल. असं पाप केल्यावर मोठी शिक्षा होते, फाशी होते ही भीती त्यांच्या मनात बसायला हवी”, असं मोदी म्हणाले.

आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला उत्तम नागरिक बनवण्याकरता

“नोकरदार महिलांसाठी १२ आठवड्यांऐवजी २६ आठवडे भरपगारी प्रसुती रजा मंजूर करण्यात आली. आम्ही महिलांचा सन्मानच करतो असं नाही तर महिलांप्रती संवेदनशील भावनाही ठेवतो. महिलेच्या पोटात जो मुलगा वाढतोय, त्याला उत्तम नागरिक बनवण्याकरता आईची गरज असते. त्यासाठी सरकार त्यांना आडकाठी आणत नाही”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.