Narendra Modi on Women Security : ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांविरोधात सुरू असलेल्या अत्याचारांवर भाष्य केलं. अशी कृत्ये करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे, असं मोदी म्हणाले. याबाबत मोदी म्हणाले, "आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत. महिला नेतृत्वही करत आहेत. संरक्षण क्षेत्रातही महिलांची ताकद दिसत आहे. पण दुसरीकडे काही चिंताजनक गोष्टीही समोर येतात. मी आज पुन्हा एकदा यावर वेदना व्यक्त करत आहे. समाज म्हणून आपल्याला विचार करावा लागेल. आपल्या माता-बहिणींवर होणाऱ्या अत्याचारांबाबत देशाचा आक्रोश आहे. "नागरिकांचा आक्रोश आहे. तो मी समजू शकतो. आपल्या देशाला, समाजाला, आपल्या राज्य सरकारांना या गोष्टी गांभीर्याने घ्याव्या लागतील. महिलांविरोधातील गुन्ह्यांचा लवकरात लवकर तपास व्हावा आणि अमानुष कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी हा विश्वास निर्माण व्हायला हवा. बलात्काराची घटना घडते तेव्हा त्याची खूप चर्चा होते. माध्यमांमध्ये येतं. पण जेव्हा अशा लोकांना शिक्षा होते, तेव्हा त्याची तेवढी चर्चा होत नाही. मला वाटतं ती मोठ्या प्रमाणावर व्हायला हवी. तेव्हा कुठे अशी कृत्य करणाऱ्यांना जरब बसेल. असं पाप केल्यावर मोठी शिक्षा होते, फाशी होते ही भीती त्यांच्या मनात बसायला हवी", असं मोदी म्हणाले. #WATCH | PM Modi says, "For working women, maternity leave has been increased from 12 weeks to 26 weeks. We not only just respect women, we not only take decisions for her sensitively, we make decisions to ensure that the government does not become a hindrance in the requirements… pic.twitter.com/iv39Wh5L9D— ANI (@ANI) August 15, 2024 आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला उत्तम नागरिक बनवण्याकरता "नोकरदार महिलांसाठी १२ आठवड्यांऐवजी २६ आठवडे भरपगारी प्रसुती रजा मंजूर करण्यात आली. आम्ही महिलांचा सन्मानच करतो असं नाही तर महिलांप्रती संवेदनशील भावनाही ठेवतो. महिलेच्या पोटात जो मुलगा वाढतोय, त्याला उत्तम नागरिक बनवण्याकरता आईची गरज असते. त्यासाठी सरकार त्यांना आडकाठी आणत नाही", असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.