नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी देशातील मुस्लिम आणि अल्पसंख्याक भीतीच्या छायेखाली जगत असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकार जातीय भेद निर्माण करत असल्याचा आरोपही केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा देश कोणा एका पक्षाचा किंवा ठराविक लोकांचा नसल्याचं स्पष्ट करावं अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
‘मला वाटतं देशात दुर्घटना सुरु आहेत. आपल्या डोक्यावर युद्धाची टांगती तलवार असून अशा दुर्दैवी परिस्थितीत आपण सापडलो आहोत. आम्हाला लोकांमध्ये शांतता आणि समजूतदारपणा हवा आहे. मात्र दुर्दैवाने या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष अनेक जातींमध्ये तेढ निर्माण कऱण्याचा प्रयत्न करत असून हेच आपल्या देशाचं दुर्दैव आहे’, असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
Farooq Abdullah: Muslims&minorities feel threatened. It’s unfortunate&I think PM should make it very clear that this nation doesn’t belong to one party or one sect of people. He should make it very clear that it belongs to all of us&we’ve to live in peace&harmony with each other. https://t.co/rb9GCa6eTd
— ANI (@ANI) March 8, 2019
‘मुस्लिम आणि अल्पसंख्यांक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगदी स्पष्ट केलं पाहिजे की, देश कोणा एका पक्षाचा किंवा ठराविक लोकांचा नाही. हा देश सर्वांचाच आहे हे त्यांनी स्पष्ट करत केलं पाहिजे. आपण सर्वांनी शांतता राखत एकत्र राहिलं पाहिजे’, असंही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
