गुजरातमधील २००२ च्या दंगली दुख:द आणि अस्वस्थ करणाऱ्या होत्या, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच व्यक्त केली. मात्र राजकीय फायद्यासाठी त्यांनी ही वेदना त्यांनी फार उशिरा व्यक्त केली, अशी टीका केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी केली.
मोदींवर हा डाग कायम राहील असे सिब्बल म्हणाले. याबाबतची व्यथा मोदींनी यापूर्वीच व्यक्त करायला हवी होती, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना कशासाठी, असा सवाल सिब्बल यांनी केला. गुजरात दंगलींच्या मुद्दय़ावर जाहीर वक्तव्य करण्याचे टाळणाऱ्या मोदींनी शुक्रवारी ब्लॉगवरून याबाबत मतप्रदर्शन केले होते. अर्थात त्यांनी माफी मागितली नव्हती. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर मुक्त आणि शांत वाटत असल्याचे म्हटले होते.