नासानं दिल्या दिवाळीच्या ‘हटके’ शुभेच्छा, ताऱ्यांचा विलोभनीय फोटो केला शेअर !

नासाने आकाशगंगेतील प्रकाशाची उधळण करणाऱ्या ताऱ्यांच्या समुहाचा फोटो शेयर करत दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा

NASA Image

दिवाळीच्या वेळी एक फोटो हमखास वायरल होतो म्हणजे प्रकाशाने उजळलेल्या भारताचा अवकाशातून काढलेला फोटो. अर्थात असा फोटो दरवर्षी काढला जातो असं सांगत सोशल मिडियावर फिरवला देखील जातो आणि दिवाळीच्या एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात. हा फोटो खरा आहे का, असल्यास तो फोटो नेमका कधी काढलेला हे मात्र अजून कधीच स्पष्ट झालेलं नाही.

असं असतांना नासाने दिवाळीच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देतांना प्रकाशमय झालेल्या भारताचा नाही तर प्रकाशाची उधळण करणाऱ्या अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाचा एक फोटो नासाने वापरला आहे. ‘ Happy Diwali to all who celebrate!’असं या संदेशात नासाने म्हंटलं आहे. एक प्रकारे दिवाळीमध्ये प्रकाशाचा झगमगाट आणि फटाक्यांमुळे वेगवेगळ्या रंगांची उधळण होत असते, अशी उधळण ही अवकाशातही कायम सुरु असल्याचं फोटोच्या माध्यामातून शुभेच्छा देतांना नासाने सांगितलं आहे.

ताऱ्यांच्या समूहाकडून होत असलेलली प्रकाशाच्या उधळण म्हणजे अवकाशातील globular cluster आहे. नासाच्या हबल या अवकाश दुर्बिणीने हा फोटो घेतला असल्याचं नासाने स्पष्ट केलं आहे. या फोटोत असंख्य तारे दिसत असून ते विविध रंगांच्या प्रकाशाची उधळण करत आहेत. ताऱ्यांचा हा समूह आकाशगंगेचे केंद्र-मध्यभाग असलेल्या ठिकाणापासून जवळ आहे.

अशा ठिकाणी असलेल्या ताऱ्यांचे फोटो घेणे हे खूप आव्हानात्मक असल्याचं नासाने सांगितलं आहे. कारण ताऱ्यांमध्ये असलेला अवकाशात हा वायू-धुळीने भरलेला असतो. असं असलं तरी हबल, चंद्रा-एक्सरे सारख्या अवकाश दुर्बिणींमुळे अशा ताऱ्यांचे फोटो घेणं शक्य झालं असल्याचं नासाने स्पष्ट केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nasa wished happy diwali asj

ताज्या बातम्या