National Anti-Terrorism Day 2025: देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचा दिवस राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन म्हणून पाळला जातो. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या कार्यकाळात याची सुरुवात झाली. २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची चेन्नईजवळी श्रीपेरुम्बदूर या ठिकाणी आत्मघाती हल्ल्यात मृत्यू झाला. देशवासीयांना दहशतवाद व समाजातील हिंसक घटनांचे परिणाम समजावून सांगणे, त्याबाबत जनजागृती करणे या हेतूने प्रामुख्याने भारतात हा राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन पाळला जातो.
या दिवशी सर्व सरकारी कार्यालये, सार्वजनिक संस्था आणि इतर सरकारी संस्था दहशतवाद व हिंसेच्या विरुद्ध लढ्याशी बांधीलकी अधोरेखित करण्यासाठी शपथ घेण्याचे कार्यक्रमही ठिकठिकाणी आयोजित करतात. याव्यतिरिक्त दहशतवाद व हिंसक कारवाया व त्यांचे दुष्परिणाम यासंदर्भात चर्चासत्रे, संवाद, सेमिनार व विशेष मार्गदर्शन आयोजित केलं जातं. अनेक स्वयंसेवी संस्था व सांस्कृतिक संस्था या उपक्रमांमध्ये सहभागी होतात.
एकतेच्या तत्वाचा पुरस्कार
दरम्यान, या दिवशी दहशतवाद व हिंसक कारवायांच्या परिणामांबाबत माहिती देण्याबरोबरच एकतेचं तत्त्व अधोरेखित केलं जातं. तसेच, शांतता व सुसंवादाच्या मूल्यांवर भर दिला जातो. याशिवाय या दिवशी दहशतवादी कारवायांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी केलेला त्याग व कट्टरतेविरुद्ध सतर्कतेची गरज याबाबत जनतेमध्ये जाणीव निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात.
राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन (National Anti-Terrorism Day Quotes)
१. दहशतवादाला कोणताही धर्म वा नागरिकत्व नाही – व्लादीमीर पुतिन
२. आम्ही थकणार नाही, डगमगणार नाही आणि हरणार नाही – जॉर्ज डब्ल्यू. बुश
३. दहशतवादाचं कोणत्याच कारणासाठी समर्थन होऊ शकत नाही – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग</p>
४. काही मूठभर लोकांना त्यांच्या कृत्याने आपल्या देशाची महान मूल्ये व आदर्शांना आम्ही झाकोळून टाकू देणार नाही – बराक ओबामा
५. दहशतवादी कारवायांसमोर आपण फक्त आपल्या नागरिकांनाच वाचवायचं नाही, तर ज्या मूल्यांमुळे आपले समाज मुक्त आणि न्याय्य ठरतात, त्या मूल्यांचंही रक्षण करायला हवं – अँजेला मर्केल
६. दहशतवादावर विजय मिळवायचा असेल, तर त्यासाठी शांततेच्या समान ध्येयासाठी एकत्र आलेल्या सर्व देशांकडून संयुक्तपणे प्रयत्न होण्याची गरज आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>
७. दहशतवादाविरोधातील लढ्यामध्ये आपण मानवी हक्क व कायद्याची तत्त्वे शाबूत ठेवायला हवीत – अँटोनियो गुटेरस